रेशन मिळत नसल्याच्या निषेधार्थ मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 12:19 IST2019-06-21T12:19:29+5:302019-06-21T12:19:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शहरातील रेशन दुकानदार व पुरवठा शाखेतील कर्मचा:यांच्या मनमानी कारभारामुळे शिधापत्रिका धारकांना नियमानुसार धान्य मिळत ...

Front of protest against not getting ration | रेशन मिळत नसल्याच्या निषेधार्थ मोर्चा

रेशन मिळत नसल्याच्या निषेधार्थ मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : शहरातील रेशन दुकानदार व पुरवठा शाखेतील कर्मचा:यांच्या मनमानी कारभारामुळे शिधापत्रिका धारकांना नियमानुसार धान्य मिळत नसल्याच्या निषेधार्थ शहर शिवसेनेच्या पदाधिका:यांच्या उपस्थितीत नागरिकांनी गुरुवारी सकाळी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा नेवून अधिका:यांना चांगलेच धारेवर धरले. या वेळी नागरिकांनी संबंधितांना शिस्त लावून नियमानुसार शिधापत्रिकाधारकांना रेशन देण्याची मागणी केली. दरम्यान, प्रभारी तहसीलदार रामजी राठोड यांनी याप्रकरणी चौकशी करून सुरळीतपणे रेशनमाल देण्याचे आश्वासन दिले.
तळोदा शहरातील शासनाच्या स्वस्त धान्य वितरण प्रणालीत मोठय़ा प्रमाणात संबंधित दुकानदार व पुरवठा शाखेतील कर्मचा:यांचा मनमानी कारभार सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना स्वस्त धान्यापासून वंचित रहावे लागत आहे. त्यांना नाईलाजास्तव बाजारपेठेतून महागडे धान्य आणून उपजिवीका भागवावी लागत आहे. दारिद्रय़रेषेखालील कुटुंबांनाही नियमानुसार धान्य न देता निम्मेच धान्य दिले जाते. एवढेच नव्हे तर प्राधान्य कुटुंबात समाविष्ट केलेल्या कुटुंबांना तर माहितीच नाही की आपल्याला सदर योजनेत समाविष्ट केले आहे. त्यामुळे त्यांचे धान्य परस्पर काळ्याबाजारात विकले जाते. अशा अनेक तक्रारी रेशनच्या मालाबाबत असताना महसूल प्रशासनाने ठोस कारवाई करण्याची आवश्यकता असताना कानावर हात ठेवले आहेत. त्यामुळे संतप्त नागरिकांनी गुरुवारी सकाळी तळोदा शहर शिवसेनेच्या पदाधिका:यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयावर धडक मोर्चा नेवून महसूल अधिका:यांना चांगलेच धारेवर धरले. या वेळी नागरिकांनी दुकानदार व कर्मचा:यांच्या मनमानीबाबत चांगलीच प्रश्नांची सरबत्ती केली होती. रेशन दुकानदार शासकीय नियमानुसार धान्य देत नाही, त्यांच्या हिशेबाने धान्य देतात. याबाबत जाब विचारला तर दुकान बंद करण्याची धमकी देतो. प्रशासनाचा वचक नसल्यामुळेच त्यांचे फावले आहे, असा आरोपही नागरिकांनी केला. याबाबत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही कार्डधारकांनी केली आहे. नवीन व दुय्यम रेशनकार्डसाठी नागरिक पुरवठा शाखेत सतत हेलपाटे मारत आहेत. तरीही शिधापत्रिका उपलब्ध करून दिली जात नाही. याउलट संबंधित कर्मचारी पैशांची मागणी करतात, असा आरोपही नागरिकांनी या वेळी अधिका:यांसमोर केला होता. त्या कर्मचा:यांचा टेबल तातडीने बदलण्याची मागणीही नागरिकांनी केली.
प्रभारी तहसीलदार रामजी राठोड यांनी संतप्त मोर्चेक:यांच्या तक्रारी ऐकून जे दुकानदार लाभार्थीना नियमानुसार धान्य देणार नाहीत अशांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. शिवाय त्या कर्मचा:यांचा टेबलही बदलण्याचे आश्वासन दिले. या वेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रकाश कुलकर्णी, शहर प्रमुख जितेंद्र दुबे, नगरसेविका प्रतीक्षा ठाकूर, संजय पटेल, तालुका संघटक विनोद वंजारी, जितेंद्र चौधरी, नितीन ठाकरे, काशीनाथ कोळी, पप्पू माळी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संतोष माळी, श्रावण तिजबीज, दीपक मोरे आदींसह नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. 
दरम्यान, या मोर्चाची सुरुवात दत्तमंदिरापासून होऊन दुकानदार व प्रशासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
 

Web Title: Front of protest against not getting ration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.