नर्मदा विकास कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 12:23 IST2019-09-04T12:23:10+5:302019-09-04T12:23:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सरदार सरोवर प्रकल्पासंदर्भात पुनर्वसन उपदलाच्या गेल्या चार महिन्यात किती बैठका झाल्या यासह प्रशासनाने केलेल्या ...

नर्मदा विकास कार्यालयावर मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सरदार सरोवर प्रकल्पासंदर्भात पुनर्वसन उपदलाच्या गेल्या चार महिन्यात किती बैठका झाल्या यासह प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती मिळावी यासाठी मंगळवारी नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकत्र्यानी प्रकल्पग्रस्तांसह नर्मदा विकास विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. दरम्यान, आंदोलनकत्र्याना समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास आंदोलनाच्या कार्यकत्र्या लतीका राजपूत, चेतन साळवे, नुरजी वसावे, पुन्या वसावे यांच्यासह शेकडो प्रकल्पग्रस्तांनी नर्मदा विकास विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. या वेळी आंदोलकांतर्फे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यात पुनर्वसन उपदलाच्या बैठकीतील माहिती मिळावी, आपत्ती व्यवस्थापन आराखडा मिळावा, धरणाच्या 138.68 मीटर उंचीवर किती कुटुंब बुडिताखाली येणार आहेत, किती कुटुंब राहतात याची माहिती मिळावी, तात्पुरत्या स्थलांतरासाठी केलेल्या खर्चाची माहिती मिळावी यासह विविध नऊ मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यावर कार्यकारी अभियंता गावीत यांनी काही मुद्यांवर लेखी माहिती दिली. तथापि, अनेक मुद्यांवर माहिती मिळाली नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. निवेदनावर लतिका राजपूत, चेतन साळवे, ओरसिंग पटले, पुन्या वसावे, किर्ता वसावे, नुरजी वसावे, नाथ्या पावरा, मांगल्या पावरा, कृष्णा पावरा, गंभीर पाडवी, धरमसिंग वसावे, लालसिंग वसावे, शामसिंग पाडवी, सायसिंग पाडवी आदींच्या सह्या आहेत.