दुर्गम भागात दवबिंंदू गोठले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 12:41 IST2020-02-03T12:40:48+5:302020-02-03T12:41:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहिर : डाब ता़ अक्कलकुवा येथे तापमान घटल्यामुळे दवबिंदू गोठत असल्याचे गेल्या तीन दिवसांपासून दिसून येत ...

दुर्गम भागात दवबिंंदू गोठले
लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहिर : डाब ता़ अक्कलकुवा येथे तापमान घटल्यामुळे दवबिंदू गोठत असल्याचे गेल्या तीन दिवसांपासून दिसून येत आहे़ यामुळे परिसरावर बर्फाची चादर अंथरल्याचा आभास निर्माण होत आहे़
सातड्याच्या अतीदुर्गम भागातील डाबच्या पाटीलपाडा येथील भांगा नुरजी वसावे यांचा घराजवळ मोर बंटीच्या चाऱ्यावर पहाटेच्या सुमारास दवबिंदू गोठल्याचे दिसून आले होते़ या भागात तापमान खालावत असल्याने जनजीवनही विस्कळीत झाले आहे़ जागोजागी पांढरे दव गोठलेले दिसून येत आहेत़