शहाद्यात फळ विक्रेत्यांमध्ये रंगली फ्रीस्टाईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 12:42 IST2019-02-16T12:41:52+5:302019-02-16T12:42:01+5:30
नंदुरबार : शहादा येथे बसस्थानक परिसरात सार्वजनिक जागेवर फळ विक्रेत्यांमध्ये फ्रि स्टाईल रंगली. दोघांविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात ...

शहाद्यात फळ विक्रेत्यांमध्ये रंगली फ्रीस्टाईल
नंदुरबार : शहादा येथे बसस्थानक परिसरात सार्वजनिक जागेवर फळ विक्रेत्यांमध्ये फ्रि स्टाईल रंगली. दोघांविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अस्लम नाजीम तेली व जुबेर भिकन बागवान रा.गरीब नवाज कॉलनी असे दोघांचे नाव आहे. 14 रोजी सायंकाळी उशीरा तेली व बागवान यांच्यात किरकोळ कारणावरून हाणामारी झाली. यामुळे बघ्यांची मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाली होती. यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग झाला होता. ही बाब लक्षात घेता पोलीस शिपाई अजय पवार यांनी शहादा पोलिसात फिर्याद दिल्याने अस्लम तेली व जुबेर बागवान यांच्याविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार जाधव करीत आहे. दरम्यान, हातगाडी चालकांमध्ये या भागात नेहमीच वादविवाद होत असतो. बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.