शैक्षणिक धोरणावर झाले मुक्त चिंतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 12:37 IST2020-02-10T12:37:09+5:302020-02-10T12:37:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बदलत्या शैक्षणिक धोरणावर आणि एकुण शैक्षणिक परिस्थितीवर अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेच्या नवव्या द्विवार्षिक ...

 Free thinking on educational policy | शैक्षणिक धोरणावर झाले मुक्त चिंतन

शैक्षणिक धोरणावर झाले मुक्त चिंतन

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : बदलत्या शैक्षणिक धोरणावर आणि एकुण शैक्षणिक परिस्थितीवर अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेच्या नवव्या द्विवार्षिक अधिवेशनात चिंतन करण्यात आले. यावेळी विविध आठ ठरावही करण्यात आले.
नंदुरबार येथील श्रॉफ हायस्कूलमध्ये अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेच्या नवव्या द्विवार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अ‍ॅड. सीमा वळवी यांच्या हस्ते करण्यात आले. नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेचे अध्यक्ष व माजी आमदार जयवंतराव ठाकरे, आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्रकुमार गावित, प्रा. डॉ. पीतांबर सरोदे, यशवंत पाटील, भास्करराव पाटील, डॉ. एन.डी .नांद्रे, सुरेखा आडम, मधुकरराव निरफराके, अ‍ॅड. विठ्ठलराव सोनवणे, राजाभाऊ महाजन, प्रा. डॉ. शरद जावडेकर, अजमल खान, रमेश पाटील, विठ्ठलराव गोटे ,हसन भाई देसाई, सुरेश सोनवणे, सयाजीराव अहिराव ,राजकुमार खामकर ,राजेंद्र जाधव, अशोक तांबटकर आदी उपस्थित होते.
जि.प.अध्यक्षा सिमा वळवी म्हणाल्या, राज्यातील प्रत्येक भौगोलिक भाग हा सामाजिक दृष्ट्या वेगवेगळा आहे. तेथील शिक्षणाच्या समस्यांचा उहापोह होणे अपेक्षीत आहे. शैक्षणिक गुणवत्तेवर भर द्यायचा असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वागताध्यक्ष राजेंद्र कुमार गावित यांनी विनाअनुदानित धोरण शासनाने रद्द करावे असे सांगितले. आमदार सुधीर तांबे यांनी शिक्षण हे मानवी परिवर्तनाचे महत्त्वाचे साधन आहे जग बदलण्याची क्षमता शिक्षणात आहे समाजातील तळागाळातील व्यक्तीला सक्षम करायचे असेल तर शिक्षण आवश्यक असल्याचे ते म्हणाले. माजी आमदार ठाकरे यांनी भारतातील प्रत्येक बालकाला विनामूल्य गुणवत्तापूर्ण व समान शिक्षण मिळालेच पाहिजे ते देण्याची घटनादत्त जबाबदारी व कर्तव्य शासनाचे असल्याचे सांगितले.
अधिवेशनात आदिवासी मुलांचे शिक्षण या परिसंवादात प्रा.डॉ. युवराज पाटील, प्रा. डॉ. सुनिल केदारे, प्रा. एस. बी. खिल्लारे यांनी सहभाग घेतला अध्यक्षस्थानी राजाभाऊ महाजन होते .तर दुसऱ्या परिसंवादात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०१९ चा आराखडा या परिसंवादात प्रा. डॉ. उमेश शिंदे, एस. एन. पाटील यांनी सहभाग घेतला. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. शरद जावडेकर होते.
सुरुवातीस माणिक चौकातील शहीद स्मारकास अभिवादन करून रॅली काढण्यात आली. अधिवेशनात प्रा. डॉ. एन.डी. नांद्रे यांना समाजनिष्ठ शिक्षक गौरव पुरस्कार देण्यात आला.
प्रास्ताविक प्रा. डॉ. एन.डी. नांद्रे, सूत्रसंचालन चेतना बिरारीस तर आभार प्रभाकर नांद्रे यांनी मानले.

हिंदू राष्ट्र व भांडवलशाहीच्या तत्वज्ञानाचा पुरस्कार करणा?्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०१९ ला नकार.
सकल घरेलू उत्पादनाच्या दहा टक्के खर्च शिक्षणावर करावा. इंग्रजी माध्यम करण्याऐवजी इंग्रजी चांगले शिकवा.
आदिवासी घटकांसाठीचा निधी पुरेपूर वापरावा. आदिवासी भागातील शाळांसाठी २००४ अनुदान धोरण स्वीकारावे.
अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेचे नाव बदलून 'अखिल भारतीय समाजवादी शिक्षणहक्क सभा' असे करावे.
कृती कार्यक्रमांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेची शाखा स्थापन व्हावी आदी ठराव करण्यात आले.

Web Title:  Free thinking on educational policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.