तोरखेडा येथे वृद्धांची मोफत आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:57 IST2021-02-06T04:57:23+5:302021-02-06T04:57:23+5:30
या वेळी असंसर्गजन्य आजारांबद्दल माहिती देऊन रक्तदाब, मधुमेह, आहार व विहाराबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. वाढत्या वयानुसार आरोग्याबाबत येणाऱ्या ...

तोरखेडा येथे वृद्धांची मोफत आरोग्य तपासणी
या वेळी असंसर्गजन्य आजारांबद्दल माहिती देऊन रक्तदाब, मधुमेह, आहार व विहाराबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. वाढत्या वयानुसार आरोग्याबाबत येणाऱ्या समस्या कमी करण्यासाठी आपल्या आरोग्याची तपासणी करणे गरजेचे आहे. म्हणून शरीरातील रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी किमान महिन्यातून एकदा रक्तदाब तपासणी केली पाहिजे. तसेच तीन महिन्यातून मधुमेह तपासणी करणे आवश्यक आहे. सिनी संस्थेचे डॉ. सुमीत देवरे यांनी राष्ट्रीय वयोवृद्धापकाळ आरोग्य सुश्रुषा कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. हा कार्यक्रम ८० गावात व आठ प्राथमिक केंद्रात सुरू आहे . यात व्यायाम, योगा व आरोग्य शिक्षण याची आवड निर्माण व्हावी यासाठी आठ ॲक्टीव्हीटी केंद्र सुरू करण्यात आले आहे. शिबिरात ६८ वयोवृद्धांची तपासणी करण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, जिल्हा आरोग्य ट्रेनिंगचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राठोड, शहादा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र वळवी, वडाळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.व्ही.बी. मोहने, डॉ. महेंद्र पाटील, डॉ.प्रशांत पवार, डॉ.सिध्दार्थ शिरसाठ, आरोग्यसेवक वाडिल, परिचारिका एन.डी. चव्हाण, पी.डी. चौधरी, राहुल जसदेव, ग्रामसेवक मराठे, सिनीचे कोऑर्डिनेटर डॉ.श्रद्धा नितनवरे, अविनाश नाईक, सुधीर ठाकरे, किशोर जाधव उपस्थित होते.