वडगाव येथे मोफत मधुमेह प्रतिबंधक उपचार शिबिर:२४५ जणांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:36 IST2021-09-07T04:36:57+5:302021-09-07T04:36:57+5:30
शिबिराचे उद्घाटन पंचायत समितीचे माजी सदस्य लगन पावरा यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी दिलीप पावरा व तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित ...

वडगाव येथे मोफत मधुमेह प्रतिबंधक उपचार शिबिर:२४५ जणांची तपासणी
शिबिराचे उद्घाटन पंचायत समितीचे माजी सदस्य लगन पावरा यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी दिलीप पावरा व तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते. या शिबिरात मधुमेह आजाराचे लक्षण असलेले २४५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात वारंवार लघवीला जाणे, विशेषतः रात्री झोपेतून लघवीसाठी उठावे लागणे, अतिप्रमाणात भूक लागणे, अतिप्रमाणात तहान लागणे, नेहमी थकवा जाणवणे, जास्त वजन वाढणे अशी लक्षणे असलेल्या ३० ते ७० वयोगटातील लोकांची मोफत रक्त शर्करा तपासणी करण्यात आली व त्यांचेवर उपचार करण्यात आले. यावेळी रुग्णांची तपासणी तज्ज्ञ डॉ. नरेंद्र मुंढे, डॉ. राजेश गिरी, डॉ. गणेश कोल्हे,डॉ. संदीप बिरारी,डॉ. सचिन सुळे यांनी केली. शिबिर यशस्वी होण्यासाठी निलेश सुळे,डॉ. सचिन सुळे, लगन डूडवे यांनी परिश्रम घेतले.