मोदींच्या शपथविधीला मोफत रिक्षाप्रवासाची सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 11:55 IST2019-05-31T11:55:45+5:302019-05-31T11:55:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रधानमंत्री पदाची शपथ घेणा:या नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याच्या दिवशी नंदुरबारातील रिक्षाचालकाने प्रवाशांना मोफत ...

Free Defense service for Modi's swearing-in | मोदींच्या शपथविधीला मोफत रिक्षाप्रवासाची सेवा

मोदींच्या शपथविधीला मोफत रिक्षाप्रवासाची सेवा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : प्रधानमंत्री पदाची शपथ घेणा:या नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याच्या दिवशी नंदुरबारातील रिक्षाचालकाने प्रवाशांना मोफत सेवा देत आनंद व्यक्त केला़ नंदुरबार ते पातोंडा अशा फे:या मारत त्यांनी प्रवाशांकडून पैसे न घेता शपथविधी सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या़ 
मोहन लोटन खांडवे (मराठे) असे रिक्षाचालकाचे नाव असून गेल्या 25 वर्षापासून ते नंदुरबारात रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतात़ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे चाहते असलेल्या खांडवे यांनी मोदींच्या शपथविधीच्या दिवशी मोफत रिक्षा चालवणार असल्याचे घोषित केले होत़े त्यानुसार त्यांनी पातोंडा येथील बसस्टॉप ते नंदुरबार शहरातील हाट दरवाजा या दरम्यान प्रवाशांची मोफत वाहतूक केली़ सकाळपासून किमान 40 प्रवाशांना त्यांनी नंदुरबार शहरातून पातोंडा गावाकडे सोडून दिल़े त्यांच्या अनोख्या आनंदाची शहरात एकच चर्चा होती़ त्यांनी रिक्षावर मोफत सेवेबाबत पोस्टरही लावले होत़े त्यांच्या रिक्षेत बसण्यासाठी गर्दी होत होती़ 
 

Web Title: Free Defense service for Modi's swearing-in