चोरीच्या 20 दुचाकींसह चौघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 12:21 IST2019-11-26T12:21:45+5:302019-11-26T12:21:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : नवापूर पोलीसांनी चोरीच्या 20 दुचाकींसह चार संशयितांना सोमवारी मोठय़ा शिताफीने अटक केली. गुजरात महाराष्ट्र ...

चोरीच्या 20 दुचाकींसह चौघे ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : नवापूर पोलीसांनी चोरीच्या 20 दुचाकींसह चार संशयितांना सोमवारी मोठय़ा शिताफीने अटक केली. गुजरात महाराष्ट्र सिमावर्ती भागातुन चोरीस गेलेली वाहने हस्तगत करण्यात आल्याने आंतरराज्य टोळी या मागे आहे का? या दिशेने नवापूर पोलीस तपास करीत आहेत.
नवापूरचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांना मिळालेल्या माहितीवरून वैभव दिलीप परदेशी रा. खांडबारा हा चोरीच्या मोटारसायकली विक्री करण्यासाठी येत असल्याचे समजले. संबधीत गुन्ह्याचा तपास करणारे हवालदार दादाभाई वाघ यांना माहीती देवुन त्या संशयित आरोपीस वाहन विक्री करतांनाच पकडायचे असे नियोजन करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर शिंपी, धिरज महाजन, हवालदार दादाभाई वाघ, जयेश बावीस्कर, योगेश साळवे, योगेश्वर तनपुरे, दिनेश बावीस्कर, आदिनाथ गोसावी व प्रविण मोरे यांचे दोन स्वतंत्र पथक तयार करण्यात आले. स्वत: गाडी विकत घ्यायची आहे असे ग्राहक बनुन हवालदार दादाभाई वाघ यांनी त्यास चिंचपाडा येथे बोलाविले. ठरल्या व्यवहाराप्रमाणे दुचाकी वाहन घेवुन संशयित तेथे येताच पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेतले.
त्याची अधीक चौकशी केली असता जफर सलीम पठाण रा. खांडबारा याचे नाव सांगीतले. त्याला तात्काळ खांडबारा येथे जावून पोलीस पथकाने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेली 20 दुचाकी वाहने नंदुरबार जिल्ह्यातुन व लगतच्या गुजरात राज्यातुन चोरल्याचे प्रशमदर्शनी समजुन आले आहे. त्यामुळे आंतरराज्य टोळी या मागे कार्यरत आहे का? या दिशेने नवापूर पोलीसांनी तपास सुरू केला आहे.
दोघा संशयितांकडून पोलीसांनी आठ दुचाकी वाहन ताब्यात घेतले. पोलीस कोठडी रिमांड घेवुन त्यांच्याकडुन अधिक माहिती घेतली असता दोन्ही संशयितांनी जवानसिंग नाईक, रा. खैरवे व सुभाष किसन वळवी, रा. निझर जि. तापी (गुजरात) या दोन संशयितांने ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी दोघांनी मिळुन चोरी केलेल्या अन्य 12 मोटारसायकली काढुन दिल्या. चौघे संशयित आरोपींकडुन चार लाख रुपये किंमतीच्या एकुण 20 मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या.