शहाद्यातून लांबवल्या चार दुचाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 13:00 IST2020-10-13T12:59:28+5:302020-10-13T13:00:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा शहरातील भवानी चौकातून एकाच रात्रीत चोरट्यांनी चार मोटारसायकली लांबवल्याची घटना समोर आली आहे. ...

Four two-wheelers removed from Shahada | शहाद्यातून लांबवल्या चार दुचाकी

शहाद्यातून लांबवल्या चार दुचाकी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहादा शहरातील भवानी चौकातून एकाच रात्रीत चोरट्यांनी चार मोटारसायकली लांबवल्याची घटना समोर आली आहे. रविवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आला.  
भवानी चौकातील नागेश शिंपी यांची १५ हजार रूपये किमतीची एमएच ३९ एई ३८४८, मोहन भोई यांची १० हजार रूपये किमतीची एमएच ३९ एस ५७७४, मालती सतवीर यांची १५ हजार रूपये किमतीची यूपी ३० एजे ९९२६ तर दिनेश विक्रम भोई यांच्या मालकीची एमएच ३९ एई ९९६४ ही १५ हजार रूपये किमतीची अशा एकूण ५५ हजार रूपयांच्या दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. शनिवारी रात्री १०.३० ते रविवारी पहाटे तीन वाजेदरम्यान या दुचाकी चोरीला गेल्या असाव्यात असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. एकाच रात्रीतून चार दुचाकी चोरीला गेल्याने एकच खळबळ उडाली असून शहादा शहरातील वसाहतींमध्ये रात्रीअपरात्री  चोरटे सक्रीय झाल्याने चिंता वाढल्या आहेत. 
याबाबत दिनेश विक्रम भोई रा. चिंतामणी मंदिराजवळ शहादा यांनी शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल असून तपास रामा वळवी करत आहेत.  

Web Title: Four two-wheelers removed from Shahada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.