नंदुरबार जिल्ह्यात चार हजार नवमतदार

By Admin | Updated: May 16, 2017 18:00 IST2017-05-16T18:00:02+5:302017-05-16T18:00:02+5:30

मतदार नोंदणी वाढवी यासाठी येत्या 1 जुलैपासून मतदार नोंदणी अभियान सुरू होणार आह़े

Four thousand new voters in Nandurbar district | नंदुरबार जिल्ह्यात चार हजार नवमतदार

नंदुरबार जिल्ह्यात चार हजार नवमतदार

ऑनलाइन लोकमत

नंदुरबार, दि. 16 - जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून राबवलेल्या विविध मतदार जनजागृती अभियानातून गत पाच महिन्यात चार हजार मतदारांची नोंदणी झाली आह़े जिल्ह्यात मतदार नोंदणी वाढवी यासाठी येत्या 1 जुलैपासून मतदार नोंदणी अभियान सुरू होणार आह़े
जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मोहिमा घेण्यात येत आहेत़ विविध महाविद्यालय, रहिवासी वसाहती, ग्रामपंचायतींच्या सभा, पंचायत समितीद्वारे एक हजाराच्या नियुक्त असलेल्या बीएलओंनी या नोंदण्या केल्या आहेत़ राज्यातील इतर भागाच्या तुलनेत ही आकडेवारी मोठी असून यात 18 ते 21 दरम्यानच्या युवकांची नोंदणी अधिक व्हावी यासाठी प्रशासनाकडून एक जुलैपासून नोंदणी अभियान पुन्हा सुरू होणार आह़े यातून जिल्ह्यातील 80 टक्के पात्र मतदार युवकांना जोडले जाणार आह़े
पुरूषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक
पाच जानेवारीपासून सुरू करण्यात आलेल्या मतदार नोंदणी अभियानात शहादा तालुक्यात एकूण 918 मतदार नोंदण्या झाल्या़ यात 419 पुरूष तर 498 स्त्रिया आहेत़ तळोदा तालुक्यात 771 नव मतदारांपैकी 387 पुरूष व 384 स्त्रिया, धडगाव तालुक्यात 300 पैकी 179 पुरूष व 131 स्त्रिया, नंदुरबार तालुक्यात एकूण 578 मतदारांच्या नोंदण्यात करण्यात आल्या आहेत़ यापैकी 347 पुरूष व 431 स्त्रिया आहेत़ नवापूर तालुक्यात 118 पुरूष आणि 179 स्त्रिया अशा एकूण 287 मतदारांची नियुक्ती करण्यात आली आह़े
गेल्या पाच महिन्यात सर्वाधिक मतदार नोंदण्या ह्या सातपुडय़ाच्या दुर्गम आणि अती दुर्गम भागाचा समावेश असलेल्या अक्कलकुवा तालुक्यात झाल्या आहेत़ याठिकाणी 598 पुरूष आणि 475 स्त्रियांच्या नोंदण्या झाल्या आहेत़ दुर्गम भागातील नागरिकांच्या या प्रतिसादामुळे निवडणूक शाखेकडून येत्या काळात दुर्गम भागात बीएलओ आणि बूथ वाढवण्याचे संकेत देण्यात आले आह़े दुर्गम भागात पाच महिन्यात झालेल्या मतदारांपैकी 60 टक्के मतदार हे 18 वर्षे पूर्ण झालेले आहेत़
जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात एकूण 11 लाख 30 हजार 590 मतदार पाच जानेवारी 2017 पूर्वी होत़े यात अक्कलकुवा विधानसभा क्षेत्रात दोन लाख 54 हजार 498, शहादा विधानसभा मतदार संघात दोन लाख 88 हजार 874, नंदुरबार विधानसभा मतदारसंघात 3 लाख 11 हजार 64 तर नवापूर मतदारसंघात दोन लाख 75 हजार 840 मतदार आहेत़
जिल्ह्यात एकूण असलेल्या 11 लाख 30 हजार 590 मतदारांमध्ये वाढ करण्यासाठी प्रशासनाने पाच जानेवारीपासून नोंदणी अभियान व मतदार जनजागृती मोहिम हाती घेतली आह़े यासाठी जिल्हाभर जनजागृती करण्यात आली होती़ यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या 1 हजार 292 मतदान केंद्राच्या एक हजार 292 बीएलओ अर्थात बूथ अधिका:यांकडून मतदार नोंदण्या करून घेण्यात आल्या आहेत़ या अधिका:यांनी घरोघरी जाऊन तसेच बसस्थानक, रेल्वेस्थानक यासह इतर सार्वजनिक जागांवरही जनजागृती केल्या होत्या़ यामुळे जिल्ह्यात नियुक्त करण्यात आलेल्या 1 हजार 292 केंद्रांमध्ये मतदार नोंदण्या केल्या गेल्या आहेत़
सुमारे दोन हजार 38 पुरूष आणि दोन हजार 88 महिला मतदारांची झालेली ही नोंदणी येत्या काळात वाढवण्यासाठी नव्याने नोंदणी सुरू करण्यात येणार आह़े एकूण चार हजार 127 नव्याने नोंदणी झालेल्या या मतदारांपैकी एक मतदार  तृतीयपंथी आह़े पुरूषांच्या तुलनेत नवमतदार महिला दीड टक्क्याने वाढल्या आहेत़ 18 वर्षे वय पूर्ण करणा:या युवक आणि युवतींनी चांगला प्रतिसाद दिल्याने जिल्ह्यात 55 टक्के नोंदण्या करण्यात प्रशासनाला यश आले आह़े उर्वरित नोंदणी न झालेले, स्थलांरित, नोकरी व कामानिमित्त जिल्ह्यात आलेले, नावात बदल असलेले, विवाह करून सासरी आलेल्या महिला यांचा समावेश आह़े
 
जिल्ह्यात आतार्पयत झालेल्या नोंदणी अभियानाचा लाभ नागरिकांनी घेतला आह़े नव्याने नोंदणी करणा:या मतदारांचा उत्साह हा चांगला आह़े येत्या एक जुलैपासून युवा मतदारांना जोडण्यासाठी मोहिम आखण्यात येत आह़े यातही नोंदण्या वाढणार आहेत़
-सुधीर खांदे, जिल्हा निवडणूक अधिकारी, नंदुरबाऱ 

Web Title: Four thousand new voters in Nandurbar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.