मागणी घालूनही मुलगी न दिल्याने चौघांची मुलीच्या वडिलांना जबर मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:28 IST2021-03-15T04:28:09+5:302021-03-15T04:28:09+5:30

नंदुरबार : मुलीला मागणी घालूनही मुुलगी दिली नाही, त्यामुळे राग येऊन चौघांनी एकास बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना ...

Four of them beat up the girl's father for not giving her a daughter despite their demands | मागणी घालूनही मुलगी न दिल्याने चौघांची मुलीच्या वडिलांना जबर मारहाण

मागणी घालूनही मुलगी न दिल्याने चौघांची मुलीच्या वडिलांना जबर मारहाण

नंदुरबार : मुलीला मागणी घालूनही मुुलगी दिली नाही, त्यामुळे राग येऊन चौघांनी एकास बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना कहाटूळ, ता. शहादा येथे घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दारसिंग पिरन भिल, रा. कहाटूळ असे जखमीचे नाव आहे. वर्षभरापूर्वी तारसिंग हारसिंग मोरे यांनी दारसिंग भिल यांच्या मुलीला मागणी घातली होती. परंतु मुलीचे लग्न जुळलेले असल्याने त्यांनी त्यास नकार दिला. त्याचा राग तारसिंग मोरे यांनी मनात धरला होता. ९ मार्च रोजी तारसिंग यांनी पुन्हा वाद घातला. वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. तारसिंग मोरे याच्यासह भीमा भालसिंग भिल, नामदेव जगन भिल, विठ्ठल जगन भिल, सर्व रा. कहाटूळ यांनी स्क्रू ड्रायव्हर व हाताबुक्क्यांनी जबर मारहाण केली. डोक्यात स्क्रू ड्रायव्हर मारून जखमी केले. याबाबत दारसिंग भिल यांनी फिर्याद दिल्याने तारसिंग मोरे, भीमा भिल, नामदेव भिल, विठ्ठल भिल यांच्याविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार दीपक परदेशी करीत आहेत.

Web Title: Four of them beat up the girl's father for not giving her a daughter despite their demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.