चौघांना न्यायालयाची दंडाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 11:30 IST2019-09-11T11:30:06+5:302019-09-11T11:30:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : संशयावरून मारहाण करणा:या चार आरोपींना अक्कलकुवा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दंडाची शिक्षा सुनावली. वाण्याविहीर येथे ...

चौघांना न्यायालयाची दंडाची शिक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : संशयावरून मारहाण करणा:या चार आरोपींना अक्कलकुवा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दंडाची शिक्षा सुनावली. वाण्याविहीर येथे ही घटना घडली होती.
राजू रेशम्या पाडवी, वनसिंग रेशम्या पाडवी, रामसिंग रेशम्या पाडवी, वणूबाई वनसिंग पाडवी, रोशनी वनसिंग पाडवी यांना ही शिक्षा सुनावण्यात आली. वाण्याविहीर येथे मार्च 2013 मध्ये घटना घडली. घरातील महिलांकडे पहातो म्हणून विचारणा केल्याचा राग येवून चार जणांनी मारहाण केली होती. तळोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायदंडाधिकारी ए.डी.करभाजन यांच्या कोर्टात खटला चालला. चौघांना प्रत्येकी पाचशे रुपये दंड आणि एक वर्ष चांगल्या वर्तवणुकीची शिक्षा सुनावण्यात आली.
सरकार पक्षातर्फे अॅड.एम.आय.मन्सूरी व अॅड.अजय सुरळकर यांनी काम पाहिले.