एकाच कुटूंबातील चौघांना डेंग्यूची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 12:18 IST2019-10-13T12:18:52+5:302019-10-13T12:18:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरात डेंग्यूसदृश तापाची साथ दिवसेंदिवस भीषण होत असून एकाच कुटूंबातील चौघे डेंग्यूची लागण झाल्याने ...

एकाच कुटूंबातील चौघांना डेंग्यूची लागण
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरात डेंग्यूसदृश तापाची साथ दिवसेंदिवस भीषण होत असून एकाच कुटूंबातील चौघे डेंग्यूची लागण झाल्याने खाजगी दवाखान्यात दाखल असल्याची घटना समोर आली आह़े खाजगी रुग्णालयांमध्ये किमान सात ते आठ रुग्ण डेंग्यूसदृश तापाची लागण झाल्याने दाखल झाल्याचे रुग्णालयांनी स्पष्ट केले आह़े
डेंग्यूची लागण होऊन 18 वर्षीय युवती दगावल्याची घटना आठ ऑक्टोबर रोजी घडली होती़ यानंतरही शहरात डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण नव्याने समोर येणे थांबलेले नाही़ अशात शुक्रवारी शहरातील एका खाजगी रुग्णालयात कोरीट रोड परिसरातील लक्ष्मीनगर भागात राहणारे प्रा़ डॉ़ सुभाषकुमार ठाकरे हे डेंग्युसदृश तापाची लागण झाल्याने उपचार घेत असल्याचे समोर आल़े त्यांच्या पत्नी उषाबाई, मुलगा उत्कर्ष व लहान मुलगा रितेश या तिघांनाही डेंग्यूसदृश तापाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनाही शहरातील तीन वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आल़े एकाच कुटूंबातील चौघांची ही अवस्था दिसून आल्यानंतर शहरात डेंग्यूचा फैलाव हा मोठय़ा प्रमाणात झाल्याचे स्पष्ट होऊनही साथीला अटकाव करण्यात यश आलेले नाही़
शहरातील खाजगी रुग्णालयात डेंग्यूसदृश तापावर उपचार घेऊन 100 पेक्षा अधिक जण घरी परतल्याचे तर तेवढेच रुग्ण पुन्हा नव्याने भरती झाल्याची माहिती आह़े
हिवताप विभागाकडून घरोघरी तपासणी करुन माहिती देण्यात येत असली तरी माहितीच्या पुढे काय, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आह़े जिल्हा रुग्णालयात सुविधा देण्यात येऊनही रुग्ण उपचारासांठी खाजगी रुग्णालये किंवा धुळे, सुरत शहरात रवाना होत असल्याने आरोग्य यंत्रणा नेमके करतयं तरी काय अशी विचारणा होत आह़े दरम्यान पालिका आरोग्य विभागाने धुरळणीसाठी तीन मशिन मागवत शहरात फवारणीला वेग दिला आह़े
डेंग्यूसृदश तापाची लागण झाल्याची शहनिशा व्हावी म्हणून शनिवारी आरोग्य यंत्रणेने 30 एमपीडब्ल्यू कर्मचा:यांचे पथक शहरात नियुक्त केले होत़े त्यांच्याकडून रक्तनमुने संकलित करण्यात आले आहेत़ त्यांच्यासोबत आरोग्य विभागाच्या अधिसेविका, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचारिका आणि आशा स्वयंसेविका यांच्याकडून शहरात जनजागृती करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े यातून डेंग्यूची नेमकी स्थिती रविवारी दुपार्पयत समोर येणार आह़े