Four-month wait for the 'Rockwell' to light up homes in remote areas | दुर्गम भागातील घरे उजळवणाऱ्या ‘रॉकेल’ची चार महिन्यांपासून प्रतिक्षा

दुर्गम भागातील घरे उजळवणाऱ्या ‘रॉकेल’ची चार महिन्यांपासून प्रतिक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
मोलगी : सातपुड्याच्या दुर्गम भागात विजेच्या तुटवड्यामुळे आदिवासी बांधवांची घरे प्रकाशमान करण्यास सहाय्यकारी ठरणारे रॉकेल चार महिन्यांपासून मिळालेले नसल्याची स्थिती आहे़ मोलगी व परिसरातील ४० गाव पाड्यांवरच्या लाभार्थींना रॉकेलच मिळाले नसल्याने त्याची तातडीने तरतूद करण्याची मागणी आहे़
अक्कलकुवा तालुक्यातील सातपुड्याच्या डोंगराळ भागात मोलगी परिसरातील ४० गावांमध्ये गेल्या एक वर्षांपासून विजेचा तुटवडा आहे़ २४ तासा किमान तीन तास वीज पुरवठा होत असल्याचा प्रकार सध्या येथे होत आहे़ रात्रीच्यावेळीही वीज पुरवठा होत नसल्याने नागरिकांना अंधारात कंदील, दिवे, चिमण्या किंवा बत्त्या पेटवण्याची वेळ येते़ यासाठी रॉकेल हे सर्वाधिक सहाय्यकारी ठरते़ परंतू गत चार महिन्यांपासून येथे रॉकेलच मिळत नसल्याचे प्रकार समोर आला आहे़ याकडे लक्ष वेधण्यासाठी येथील नागरिकांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन दिले आहे़ निवेदनात मोलगी परिसरात सातत्याने निर्माण होणाऱ्या वीज समस्येवर तसेच रॉकेलच्या टंचाईवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे़ हे निवेदन भगवान ढोले, मंगलसिंग अहिरे, रामसिंग परमार, फुलसिंग रहासे, दिनकर पाडवी, देवीदास बागुल, प्रकाशचंद सोलंकी, राजू पिंजारी, चंद्रसिंग वसावे, कोचºया वसावे, कृष्णा वसावे, सुनिल पाडवी, गणेश वळवी, खेमचंद वसावे, पंकज जैन, महावीर टाक, मोतीराम चौधरी, अनिल माळी, बुधा महाले, इश्ताक सय्यद, विनोद ढोले यांनी दिले आहे़
रॉकेल टंचाईबाबत प्रशासनाने योग्य तो निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे़ रॉकेलच्या टंचाईमुळे गाव-पाड्यात अंधारात चाचपडणाºया आदिवासी बांधवांना सर्वाधिक धोका हा विषारी सर्पांचा आहे़ रात्री अपरात्री घरात घुसणाºया अनर्थ होण्याची भिती आहे़ विजेचा प्रश्न निकाली निघावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करुनही कारवाई होत नसल्याचे चित्र आहे़ त्यातून मग सहाय्यकारी ठरणाºया जीवनावश्यक वस्तूंचा ठोसपणे पुरवठा करावा अशी मागणी आहे़

Web Title: Four-month wait for the 'Rockwell' to light up homes in remote areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.