अंगणवाडय़ांची तपासणीसाठी चार सदस्यीय पथक स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 11:52 IST2019-06-13T11:51:48+5:302019-06-13T11:52:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पेसा क्षेत्रात काम करणा:या अधिकारी-कर्मचा:यांनी बालके कुपोषीत राहू नये यासाठी संवेदनशीलतेने आणि तत्परतेने काम ...

अंगणवाडय़ांची तपासणीसाठी चार सदस्यीय पथक स्थापन
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पेसा क्षेत्रात काम करणा:या अधिकारी-कर्मचा:यांनी बालके कुपोषीत राहू नये यासाठी संवेदनशीलतेने आणि तत्परतेने काम करावे अशा सुचना जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी दिल्या. दरम्यान, अंगणवाडय़ांना अचानक भेट देण्यासाठी चार सदस्यीय पथक नियुक्त करण्यात येणार आहे.
नवसंजीवनी आणि गाभा समितीची बैठक बुधवारी झाली. त्यावेळी जिल्हाधिकारी मंजुळे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सहायक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पुरवठा अधिकारी जितेंद्र भांगरे, सामाजिक कार्यकत्र्या प्रतिभा शिंदे, डॉ.कांतिलाल टाटीया उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी मंजुळे म्हणाले, बालकांना स्थानिक स्तरावर उपलब्ध होणारा पोषण आहार देता यावा यासाठी महिला व बालविकास आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा.
वैद्यकीय अधिका:यांनी आरोग्य केंद्रात उपस्थित राहून बालकांची वेळेवर तपासणी व उपचार होतील याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. नवसंजीवनीच्या संवेदनशील भागात 18 जूनर्पयत जलशुद्धीकरणाचे औषध घरोघरी वाटप करण्यात यावे.
बालविकास प्रकल्प अधिका:यांनी आठवडय़ातील दोन दिवस अंगणवाडय़ांना अचानक भेट देवून कामकाजाची पाहणी करावी. या भागात धान्यपुरवठा पाऊस येण्यापूर्वी होईल याची दक्षता घ्यावी अस निर्देश देखील त्यांनी दिले. शिवाय अंगणवाडय़ांना भेट देण्यासाठी चार सदस्यांचे पथक स्थापन करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
जिल्हा परिषद सीईओ गौडा यांनी कमी वजनाच्या बालकांवर करण्यात येणारे उपचार व त्यांची वैद्यकीय तपासणीबाबत माहिती सादर करण्याचे निर्देश दिले. अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षकांना मोबाईल देण्यात येत असून अॅपच्या माध्यमातून त्यांच्या कामकाजाची माहिती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
धडगाव तालुक्यातील 18 गावे आणि अक्कलकुवा तालुक्यातील 11 गावात चार महिन्यांचे धान्य पोहचविण्यात आले आहे. शहादा तालुक्यातील आठ गावात दोन महिन्यांचे धान्य देण्यात आले असून येत्या काही दिवसात तळोदा तालुक्यातील गावांमध्येही धान्य पोहचणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी गौडा यांनी दिली.