पावणेचार लाखाचा मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 11:37 IST2019-12-19T11:37:11+5:302019-12-19T11:37:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोराई ता़ अक्कलकुवा येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने टाकलेल्या धाडीत पावणेचार लाख रुपयांचा ...

Four lakhs worth of liquor seized | पावणेचार लाखाचा मद्यसाठा जप्त

पावणेचार लाखाचा मद्यसाठा जप्त


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोराई ता़ अक्कलकुवा येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने टाकलेल्या धाडीत पावणेचार लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला़ बुधवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली़
कोराई येथील बंद घरात अवैध मद्याचा साठा असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती़ त्यानुसार पोलीस निरीक्षक किशोर नवले यांच्यासह पथकाने कोराई गावातील गोटपाडा रस्त्यावरील घराच्या परिसरात भेट देत पाहणी केली होती़ यावेळी पथकाला बंद घरात मद्यसाठा असल्याचे दिसून आले़ पथकाने दरवाजा तोडून तपासणी केली असता, ३ लाख ८३ हजार ५२० रुपयांची अवैध दारु त्यांना मिळून आली़ हे घर राजू पारत्या पाडवी रा़ ओहवाकुवा याच्या मालकीचे असल्याची माहिती आहे़
याबाबत पोलीस नाईक सुनील पाडवी यांच्या फिर्यादीवरुन संशयित घरमालक राजू पाडवी व मनोज मगन चौधरी रा़ खापर या दोघांविरोधात अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन मुद्देमाल जप्त करण्यात आला़
ही कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत व अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस कॉन्स्टेबल मुकेश तावडे, सजन वाघ, बापू बागुल, युवराज चव्हाण, मनोज नाईक, गणेश मराठे यांच्या पथकाने केली़

Web Title: Four lakhs worth of liquor seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.