शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

खांडबारा येथे चार लाखांचा खतसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 1:05 PM

तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार/खांडबारा : कृषी विभागाच्या पथकाने खांडबारा येथे शनिवारी रात्री धाड टाकून दोन ठिकाणाहून सुमारे चार लाख रुपये किंमतीचा खताचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध विसरवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भारती दगडू परदेशी, राहुल दगडू परदेशी, किरण सुरेश परदेशी सर्व रा.खांडबारा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या युरियाची टंचाई आहे. अनेक ठिकाणी शेतकरी युरियासाठी रांगा लावत आहेत. असे असतांना खांडबारा येथे दोन कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी विनापरवाना युरियाचा साठा केला. ही बाब कृषी विभागाचा दक्षता पथकाला कळाल्यावर खांडबारा येथे धाडी टाकण्यात आल्या. श्री कृषी सेवा केंद्राच्या उमरीपाडा येथील गोडावूनमध्ये सात हजाराचे मिश्र   खते, साडेचार हजाराचे सिंगल सुपर फॉस्फेट व 42 हजार 500 रुपयांचे युरिया असे एकुण 54 हजार रुपयांच्या 185 गोण्या जप्त करण्यात आल्या. याशिवाय शनिकृपा कृषी सेवा केंद्राच्या गोदामातून 15 हजार 960 रुपये किंमतीचा युरिया, एक लाख 89 हजार रुपये किंमतीचे मिश्र खत, 15 हजार 960 रुपये किंमतीचे इफको खत, नऊ हजार 800 रुपये किंमतीचे संयुक्त खत, 22 हजार 700 रुपयांचे मिश्र खत, 88 हजार रुपये किंमतीच मिश्र व 14 हजार 800 रुपये किंमतीचे पोटॅश खत असे एकुण तीन लाख 56 हजार 695 रुपये किंमतीच्या खतांच्या एकुण 516 गोण्या जप्त करण्यात आल्या.याबाबत जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी अरुण तायडे यांनी फिर्याद दिल्याने भारती दगडू परदेशी, राहुल दगडू परदेशी, किरण सुरेश परदेशी सर्व रा.खांडबारा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, कृषी विभागाने केलेली आठवडय़ातील ही दुसरी कारवाई आहे.