शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
4
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
6
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
7
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
8
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
9
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
10
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
11
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
12
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
13
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
14
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
15
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
16
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
17
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
18
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
19
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
20
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका

लाकूडसह चार लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 12:23 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : तालुक्यातील वडकळंबी व भामरमाळ येथे वनविभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत सुमारे चार लाख रुपये किमतीचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : तालुक्यातील वडकळंबी व भामरमाळ येथे वनविभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत सुमारे चार लाख रुपये किमतीचे लाकुड व यंत्र असा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनविभागाच्या सुत्रांनुसार 14 रोजी नंदुरबार वनविभागाचे सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांना मौजे वडकळंबी व भामरमाळ येथील शेतांमधे अवैध तोडीचे मौल्यवान लाकुड व फर्निचर बनविण्याचे यंत्र असल्याची गुप्त बातमी मिळाली. माहितीनुसार दोन पथक तयार करुन नवापूर वनक्षेत्रातील मौजे वडकळंबी  येथील शेगा रेशमा गावीत व भामरमाळ येथील यशंवत गोमा गावीत या दोघांच्या घरांची झडती घेण्यात आली. कार्यवाही दरम्यान दोन्ही ठिकाणी रंधा मशिन व ताज्या तोडीचे साग, सिसम व आड जात चौपाट, तयार दरवाजाचे तीन शटर व बॉक्स पलंग आदी मुद्देमाल व यंत्र सामुग्री आढळुन आली. लाकुड व यंत्र जप्त करुन खाजगी व शासकीय वाहनाने नवापूर येथील शासकीय काष्ट आगारात जमा करण्यात आला. जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे चार लाख रुपये आहे. ही कार्यवाही नंदुरबारचे सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे, वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे, वनपाल प्रकाश मावची, डी. के. जाधव, वनरक्षक कमलेश वसावे, नितिन पाटील, दिपक पाटील, सतिष पदमोर, संजय बडगुजर, संतोष गायकवाड, रामदास पावरा, अशोक पावरा, लक्ष्मण पवार, दिपाली पाटील, संगिता खैरनार, आरती नगराळे, वाहन चालक भगवान साळवे, एस.एस तुंगार, आबा न्याहळदे, माजी सैनिक विशाल शिरसाठ, रविंद्र कासे यांनी केली. या गुन्ह्याची प्रादेशिक वनक्षेत्रपाल नवापूर यांनी नोंद घेउन दोन संशयित आरोपींविरुध्द वन कायद्याच्या कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.