सोनगडनजीक अपघातात मालेगावचे चारजण ठार तर १५ जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 12:21 IST2020-03-03T12:21:42+5:302020-03-03T12:21:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : सोनगढ जवळ पोखरण गावाच्या शिवारात गुजरात परिवहन विभागाची एस. टी. बस, टॅकर व जीपगाडी ...

सोनगडनजीक अपघातात मालेगावचे चारजण ठार तर १५ जण जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : सोनगढ जवळ पोखरण गावाच्या शिवारात गुजरात परिवहन विभागाची एस. टी. बस, टॅकर व जीपगाडी अश्या तीन वाहनांच्या झालेल्या अपघातात आठ जण ठार तर २९ जण जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. त्यात मालेगावनजीकच्या गुगळवाडी येथील चौघांचा मृतांमध्ये समावेश आहे. तर १२ जण जबर जखमी झाले. नवापूर येथील तिघांचाही जखमींमध्ये समावेश आहे.
मृतांमध्ये समाधान अशोक शिंदे (३५), रा.वनपट, ता.मालेगाव, (५०), अशोक आत्माराम निकम (३८), विश्वास रतन निकम (४२), पर्बत देवचंद निकम (३५) सर्व रा.गुगळवड, ता.मालेगाव अशी महाराष्टÑातील मयतांची नावे आहेत. तर हसमूख रामू गामीत (बसचालक) टँकरमधील तिघा मृतकांची ओळख पटली नाही.
सोनगढहून उकाईकडे येणारी गुजरात परिवहन विभागाची एस. टी. बस ( क्रमांक जीजे १८ झेङ ६४६८) व सुरतकडे आॅईल वाहुन नेणारा रिकामा टॅकर (क्रमांक जीजे ०२ एएस ६५८८) भरधाव वेगाने जात असतांना सोनगढ पासुन सात किलोमिटर अंतरावर पोखरण गावाच्या शिवारात समोरासमोर धडकले. यात भर म्हणुन मालेगाव कडुन सुरतेकडे जाणारी जीप (क्रमांक एमएच ४१- एएस ५३०९) दोन्ही अपघातग्रस्त वाहनांच्या मधोमध जाऊन धडकली. बस व टॅकरच्या दर्शनी भागाचा अक्षरश: चुराडा झाला. या अपघातात नऊ जण जागीच ठार झाल्याचे वृत्त असुन मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त होत आहे. जखमींना सोनगढ, व्यारा व सुरत येथे उपचारार्थ हलविण्यात आले आहे.
मृतात मालेगावच्या निकम परिवारातील अशोक निकम, विश्वास रतन निकम, समाधान निकम या तिघांचा समावेश आहे. जीप मधील सहप्रवाशी प्रतिभा समाधान निकम (३०), दिपक देवराम निकम (५०), बाळा दौलत पवार (६०), कैलास रतन निकम (६५), नितीन दाऊल शिंदे (२०), महेश संतोष निकम (३५), सुरेखा अताळे (४०), सुरेश दौलम निकम (६०), उमेश अरुण पवार (२६), राजेंद्र रामदास निकम (५४), प्रितेश अजय निकम (२०), सरला रामदास सामुद्रे (३०), सुरेशखा मुरलीधर निकम (५०), संजय आत्माराम निकम (४०), राजेंद्र रामदास निकम (३५) सर्व रा.मालेगाव, प्रिती सुरेश वसावा (१८) रा.निमदर्डा, ता.नवापूर, सागर रमण गोस्वामी (२६), राहुल राजू गोस्वामी (२६) रा.नवापूर असे महाराष्टÑातील जखमींची नावे आहेत. याशिवाय गुजरातमधील सोनगड व व्यारा येथील काही जणांचा समावेश आहे.
त्यांना व्यारा व सुरत येथे हलविण्यात आले आहे. जखमींमधे नवापूर येथील सागर रमला गोस्वामी व राहुल राजु गोस्वामी यांचाही समावेश आहे. बस व जीप मधील एकुण २९ प्रवासी जखमी असुन त्यात सात जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
मयत सात जणांची उशीरापर्यंत ओळख पटली नव्हती. अपघाताची भिषणता पाहुन महामार्गावरुन जाणाऱ्या वाहन धारकांनी आपल्या वाहनातुन जखमींना सोनगढ व व्यारा पावेतो आणले. सोनगढ व व्यारा येथील स्वयंसेवी समाजकार्य करणारे असंख्य युवक घटनास्थळी धावुन गेल्याने बचाव कार्यात गती आली.