जमावाच्या मारहाणीत चारजण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 12:16 IST2019-11-07T12:16:42+5:302019-11-07T12:16:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : उन्हात वाळविण्यासाठी ठेवलेले कपडे फेकून दिल्याच्या कारणावरून जमावाने घरात घुसून जबर मारहाण केल्याने चारजण ...

जमावाच्या मारहाणीत चारजण जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : उन्हात वाळविण्यासाठी ठेवलेले कपडे फेकून दिल्याच्या कारणावरून जमावाने घरात घुसून जबर मारहाण केल्याने चारजण जखमी झाल्याची घटना 5 रोजी शहादा येथील भेंडवानाला परिसरात घडली. जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भेंडवा नाला परिसरात राहणा:या दोन कुटूंबांमध्ये ही हाणामारी झाली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा येथील भेंडवानाला परिसरात वाळविण्यासाठी टाकण्यात आलेल्या गोधडय़ा व कपडे चंदू पवार याने फेकून दिले. याबाबत सुशिलाबाई सोमा सूर्यवंशी यांनी विचारणा केली असता त्याचा राग येवून पवार परिवारातील जमावाने सूर्यवंशी यांच्या घरात घुसून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यात सुशिलाबाई सोमा सूर्यवंशी, गणेश सोमा सूर्यवंशी, कृष्णा सोमा सूर्यवंशी, आशा सोमा सूर्यवंशी सर्व रा.भेंडवानाला हे जखमी झाले. त्यांच्यावर शहादा येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले.
याबाबत रेशमाबाई भू:या पवार, प्रदीप पवार, चंदू पवार, मन्नू पवार, भू:या पवार यांच्याविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार शेख करीत आहे.