पाणीदार गावासाठी सीईओंचे चार तास श्रमदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 12:01 IST2019-04-18T12:01:52+5:302019-04-18T12:01:57+5:30
अधिका:यांची उपस्थिती : नंदुरबार तालुक्यातील कोठली येथे सहभाग

पाणीदार गावासाठी सीईओंचे चार तास श्रमदान
नंदुरबार : गाव पाणी करण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांमध्ये श्रमदान सुरु आह़े मंगळवारी या उपक्रमात प्रशासकीय अधिका:यांनी सहभाग दिला होता़ दरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी कोठली येथे चार तास श्रमदान करत नवीन आदर्श घालून दिला़
कोठली येथे मंगळवारी सायंकाळी सात ते रात्री 11 यावेळेत जलसंधारणाच्या विविध कामांसाठी श्रमदान उपक्रम हाती घेण्यात आला होता़ गावातील महिला-पुरुष, बचत गटाचे सभासद, मुले-मुले, शिक्षक-शिक्षिका, जलमित्र यांच्याकडून श्रमदानाचे नियोजन सुरु असताना मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी अधिका:यांसह उपस्थिती देत श्रमदानात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करत कामालाही प्रत्यक्षात सुरुवात केली़ त्यांच्याकडून तब्बल 11 वाजेर्पयत श्रमदान केले गेल़े यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीष सांगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पठारे, नरेगाचे अनिकेत पाटील, गट विकास अधिकारी अशोक पटाईत उपस्थित होत़े
प्रसंगी पाणी फाऊंडेशनचे सुरज शिंदे, कल्पेश पाटील, विलास चौहान, ग्रामविकास अधिकारी आऱडी़पवार यांनी अधिका:यांना जलसंधारणाच्या कामांची माहिती दिली़