लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : एकाच रात्री चोरटय़ांनी चार शेतक:यांच्या विद्युत मोटारी चोरून नेल्याची घटना आक्राळे शिवारात घडली. यामुळे शेतक:यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. चोरटय़ांचा शोध घेण्याची मागणी होत आहे. आक्राळे शिवारात शेती साहित्य चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. एकाच रात्री चोरटय़ांनी चार शेतक:यांच्या मोटारी चोरून नेल्याची घटना घडली. छगन धनगर, हरचंद धनगर, आनंदा धनगर, वंसराज वंजारी यांच्या शेतातील इलेक्ट्रीक मोटारी चोरून नेल्या. या मोटारींची किंमत 22 हजार रुपये आहे. याबाबत रावसाहेब संतोष पाटील यांनी फिर्याद दिल्याने तालुका पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक भिल करीत आहे.दरम्यान, या भागात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आधीच दुष्काळाने शेतकरी होरपळला जातोय. त्यात अशा चोरींमुळे दुष्काळात तेरावा महिना अशी गत शेतक:यांची होत आहे. यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. चोरटय़ांचा शोध घेण्याची मागणी होत आहे.
एकाच रात्री चार शेतक:यांच्या विद्युत मोटारी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 11:42 IST