अक्कलकुवा येथील जामिया शैक्षणिक संस्थेतून चार बालके बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 18:45 IST2017-07-19T18:45:36+5:302017-07-19T18:45:36+5:30
अक्कलकुवा पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल

अक्कलकुवा येथील जामिया शैक्षणिक संस्थेतून चार बालके बेपत्ता
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि. 19- अक्कलकुवा येथील जामिया शैक्षणिक संकुलातून एकाचवेळी चार बालके बेपत्ता झाल्या प्रकरणी अक्कलकुवा पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मोहम्मद किस्मत अली शेख यांनी फिर्याद दिली आहे. बेपत्ता झालेल्या बालकांमध्ये हायबुल इस्लाम पिता सैय्यद अली (1 वर्ष), इनामुल हसन अब्दुल खाटीक (12), हबीबूर रहेमान सईद अली (12), आशिफूल इस्लाम सिद्धिकी अली (12) यांचा समावेश आहे. ही बालके जामिया ईस्लामिया ईसातुल उलुम या संस्थेत शिक्षण घेत होते. त्याच ठिकाणी त्यांच्या राहण्याचीही व्यवस्था होती. 13 जुलै रोजी सायंकाळी चार वाजता ही बालके बेपत्ता झाली.