पातोंडा शिवारात वीज चोरीचे चार गुन्हे आले उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 13:02 IST2020-12-31T13:02:04+5:302020-12-31T13:02:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरालगतच्या पातोंडा शिवारात अनधिकृतपणे वीज चोरी केल्याचे चार गुन्हे एमएसईबीच्या अभियंत्यांनी उघडकीस आणले. ...

पातोंडा शिवारात वीज चोरीचे चार गुन्हे आले उघडकीस
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरालगतच्या पातोंडा शिवारात अनधिकृतपणे वीज चोरी केल्याचे चार गुन्हे एमएसईबीच्या अभियंत्यांनी उघडकीस आणले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चाैघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पातोंडा शिवारातील मातोश्री कॉलनीत वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता राजीव गणेश रंजन हे तपासणी करत असताना मनोज बबन कोतवाल यांच्या प्लॉट क्रमांक ३५ येथे ३ हजार ३५० रुपये किमतीची ६० युनिट वीज चोरी झाल्याचे उघड झाले. तपासणी दरम्यान प्लाॅट क्रमांक ३३ मध्ये गणेश मनोज पाटील यांनी ३ हजार ३६० रुपये, राहुल बळीराम गवळी यांच्या प्लॉट क्रमांक ३९येथे ३ हजार ४६० तर भूपेंंद्र पाटील यांच्या प्लाॅट क्रमांक २१ मध्ये ३ हजार ३५० रुपयांची वीज चोरी झाल्याचे उघडकीस आले.याप्रकरणी मनोज काेतवाल, गणेश मनोज पाटील, राहुल गवळी व भूपेंद्र पाटील यांच्याविरोधात अभियंता राजीव रंजन यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.