शहाद्यात किरकोळ कारणातून हाणामारी करणाऱ्या चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 13:22 IST2020-04-25T13:21:53+5:302020-04-25T13:22:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : किरकोळ कारणातून शहाद्यात झालेल्या हाणामारी प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी ...

शहाद्यात किरकोळ कारणातून हाणामारी करणाऱ्या चौघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : किरकोळ कारणातून शहाद्यात झालेल्या हाणामारी प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. मारहाण, भावना दुखावणे तसेच जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये साजीद बुरहान कुरेशी, जाकीर बुरहान कुरेशी, जगदीश तुळशीराम साठे, सागर तुळशीराम साठे सर्व रा.भवानी चौक यांचा समावेश आहे. पहिली फिर्याद साजिद कुरेशी यांनी दिली.
अमरधामजवळील सार्वजनिक शौचालयाजवळ जगदीश साठे व सागर साठे यांनी तुमच्यामुळे जीवघेणा आजार पसरत असल्याचे सांगत हातबुक्यांनी बेदम मारहाण केली तसेच भावना दुखावत ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जगदीश व सागर साठे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी फिर्याद जगदीश साठे यांनी दिली. अमरधाम जवळील सार्वजनिक शौचालयात गेल्यानंतर उशीराने का निघाला म्हणून साजीद कुरेशी व जाकीर कुरेशी यांनी वाद घातला. दोघांनी बेदम मारहाण करून खिशातील ६०० रुपये काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
साठे यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. तपास सहायक निरिक्षक निलेश वाघ व फौजदार पी.के.माळी करीत आहे.