साडेचार लाखांचा दारूसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 12:21 IST2020-02-29T12:21:35+5:302020-02-29T12:21:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : अक्कलकुवा पोलिसांनी वाण्याविहीर येथे धाड टाकून साडेचार लाखांचा दारूसाठा जप्त केला. याप्रकरणी एकास अटक ...

साडेचार लाखांचा दारूसाठा जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : अक्कलकुवा पोलिसांनी वाण्याविहीर येथे धाड टाकून साडेचार लाखांचा दारूसाठा जप्त केला. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.
वाण्याविहिर येथे अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती अक्कलकुवा पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरिक्षक डांगे यांनी पथक नेमून कारवाईसाठी पाठविले. पथकाने वाण्याविहिर येथील संशयीत हेमराज ठाकुर यांच्या घराजवळ जावून तपासणी केली. तेथे ठाकूर हे देखील आढळून आले. त्यांच्या घराची झडती घेतली असता घरात देशी, विदेशी दारूचा ४ लाख ४६ हजार ४०० रुपये किंमतीचा दारूचा साठा आढळून आला. ठाकुर यास ताब्यात घेतले असता त्याने जयेश भगवान चौधरी यांच्या सहकार्याने हा धंदा करीत असल्याचे सांगितले. पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई सहायक पोलीस निरिक्षक डी.डी.पाटील, परंग नाईक, गिरीष सांगळे, रविंद्र सूर्यवंशी, अविनाश रंगारे, कन्हैया परदेशी, जयसिंग वसावे, रमा पाडवी यांनी केली.