मोलगी पोलीस ठाण्याचे चार बाधित कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 12:10 IST2020-07-08T12:10:07+5:302020-07-08T12:10:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल येथील कोविड कक्षात उपचार घेणाऱ्या चार जणांना सायंकाळी डिस्चार्ज देण्यात आला़ ...

मोलगी पोलीस ठाण्याचे चार बाधित कोरोनामुक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल येथील कोविड कक्षात उपचार घेणाऱ्या चार जणांना सायंकाळी डिस्चार्ज देण्यात आला़ चौघांचा अहवाल नेगेटिव्ह आल्याने ही कारवाई करण्यात आली़ कोरोनामुक्त झालेले चौघेही मोलगी ता़ अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे कर्मचारी आहेत़ यातील एक जण अक्कलकुवा तर तिघे मोलगी येथील रहिवासी आहेत़
मोलगी पोलीस ठाण्यातील सहा जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता़ त्यांच्यावर उपचार सुरू होते़ दरम्यान यातील चौघांचे अहवाल हे निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़ चौघे जण घरी गेल्याने जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ही आता १४६ एवढी झाली आहे़
दुपारी पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते़ तर सायंकाळी चार जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याने कक्षात उपचार घेणाऱ्यांची संख्या ही ३८ झाली आहे़ चारही जणांना सन्मानाने घराकडे रवाना करण्यात आले़ यावेळी जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते़ कोरोनामुक्तीचा दर दिवसेंदिवस वाढत असल्याने समाधान व्यक्त होत आहे़