मामाचे मोहिदे येथे चार एकर गहू आगीत खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 12:31 IST2020-04-13T12:27:54+5:302020-04-13T12:31:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील मामाचे मोहिदे शिवारातील चार एकर गव्हाच्या पिकाला शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याने काढणीवर आलेले पीक ...

Four acres of wheat fire at Mama's Mohide | मामाचे मोहिदे येथे चार एकर गहू आगीत खाक

मामाचे मोहिदे येथे चार एकर गहू आगीत खाक

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तालुक्यातील मामाचे मोहिदे शिवारातील चार एकर गव्हाच्या पिकाला शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याने काढणीवर आलेले पीक जळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचा महसूल विभागाने पंचनामा केला असून, सुमारे एक लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
याबाबत असे की, मामाचे मोहिदे, ता.शहादा येथील शंकर खंडू महिरे यांचे मोहिदे शिवारातील गट नं.११८/२ या शेतातील एक हेक्टर २० आर गव्हाचा पेरा करण्यात आला होता. ऐन काढणीवर असलेले पीक शेतातून गेलेल्या उच्चदाबाच्या विद्युत वाहिनीच्या तारांमध्ये शॉर्टशर्कीट झाल्याने चार एकर गहू जळून खाक झाला आहे. याबाबत शेतकºयाने महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती कळविल्याने तलाठ्यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला आहे. पंचनाम्यात ५० पोती गहू पिकाचे आजच्या बाजार भावाप्रमाणे एक लाख रूपयांचे नुकसान झाल्याची नमुद करण्यात आली आहे. याबाबत या शेतकºयाने शहादा पोलिसांत खबर दिल्याने अग्नीउपद्रवाची नोंद करण्यात आली आहे.
हातातोंडाशी आलेला घास जळून खाक झाल्याने शेतकरी हवालदिल होऊन आर्थिक संकटात सापडला आहे. महसूल विभाग व वीजवितरण कंपनीकडून संबंधित शेतकºयास त्वरित नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Four acres of wheat fire at Mama's Mohide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.