माजी मंत्री लोणीकरांच्या वक्तव्याचा शहाद्यात निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 13:01 IST2020-02-07T13:01:00+5:302020-02-07T13:01:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहाद : भाजपाचे नेते तथा माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी शेतकरी व महिला तहसीलदारा बद्दल अपशब्द ...

माजी मंत्री लोणीकरांच्या वक्तव्याचा शहाद्यात निषेध
लोकमत न्यूज नेटवर्क
शहाद : भाजपाचे नेते तथा माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी शेतकरी व महिला तहसीलदारा बद्दल अपशब्द वापरून अवमान केल्याच्या निषेधार्थ जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जाहीर निषेध व्यक्त केला.
शहादा येथील प्रकाशा रोडावर चिडलेल्या महिलांनी लोणीकरांच्या पोस्टरला चपलांचा मार देत जाहीर निषेध व्यक्त केला. लोणीकर यांनी केवळ त्या महिलेचा नव्हे तर संपूर्ण महिला जातीचा अवमान केलेला आहे. शेतकरी व महिला अधिकाऱ्यांची त्यांनी माफी मागावी. सोबतच त्यांच्यावर विनयभंगाच्या गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी संतप्त झालेल्या महिलांनी केलेली आहे. बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रकाशा रोडावरील शिरूड चौफुलीजवळ महिलांनी जाहीर निषेध व्यक्त केला. या दरम्यान काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. या वेळी नंदुरबार जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा हेमलता शितोळे, वंदना सैंदाणे, लता कोळी, शोभा लोहार, अनुराधा शितोळे, पुष्पा जगताप, लता मराठे, कमलबाई अलकरी, संगीताबाई मराठे यासह महिला उपस्थित होत्या.