माजीमंत्री गावीतांच्या सेवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 11:22 IST2019-04-06T11:22:35+5:302019-04-06T11:22:45+5:30

प्रकृती स्थिर : घटनेने जिल्हाभरात खळबळ

Former minister Gavitant's suicide attempt | माजीमंत्री गावीतांच्या सेवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

माजीमंत्री गावीतांच्या सेवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

नवापूर : माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावीत यांचे सेवक भगवान गिरासे यांनी गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला़ त्यांच्यावर नंदुरबार येथे उपचार सुरु असून प्रकृती स्थिर आहे़
भगवान रामचंद्र गिरासे हे ३० मार्च रोजी मुंबई येथून बेपत्ता झाल्यानंतर चर्चेत आले होते़ दरम्यान १ एप्रिल रोजी ते नवापूर येथे परतले होते़ त्यानंतर गेल्या चार दिवसांपासून ते कोणाशीही बोलत नव्हते़ विमनस्क अवस्थेत असल्याने त्यांना गुरुवारी त्यांच्या कुटूंबियांनी नाशिक येथे उपचारासाठी नेले होते़ तेथून परतल्यानंतर त्यांचे सर्व रिपोर्टस हे नॉर्मल असल्याची माहिती देण्यात आली होती़ डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता़ दरम्यान त्यांनी शुक्रवारी सकाळी घरात कोणीही नसल्याचे पाहून आत्महत्येचा प्रयत्न केला़ त्यांच्या पत्नीच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केल्यावर शेजारील महिलांनी एकत्र येत दरवाजा तोडला़ यावेळी त्यांच्या पत्नीने गळफास घेतलेला दोर कापून रुग्णालयात दाखल केले़ नवापूर येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार पूर्ण करण्यात आल्यानंतर त्यांनी नंदुरबार येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ याठिकाणी त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे़ घटनेमुळे नंदुरबार जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे़ भगवान गिरासे यांचे वडील रामचंद्र गिरासे हे माणिकराव गावीत यांचे स्वीय सहायक होते़ भगवान गिरासे हे विसरवाडी येथील सार्वजनिक हायस्कूलमध्ये शिपाई पदावर कार्यरत आहेत़ ते माजीमंत्री गावीत यांचे केअर टेकर असून स्वीय सहायक नाहीत, सोशल मिडियातून त्यांना माणिकराव गावीतांचे स्वीय सहायक संबोधून राजकीय रंग दिला जात आहे़ त्यांचे मुंबई येथून बेपत्ता होणे किंवा आत्महत्येचा प्रयत्न याच्याशी माणिकराव गावीत यांच्याा कुटूंबाचा कोणताही संबध नसल्याचा खुलासा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत गावीत यांनी केला आहे़ भगवान गिरासे हे सत्यकथन करतील असेही त्यांनी सांगितले आहे़

माजीमंत्री गावीतांच्या सेवकाचा आत्महत्येचा प्रयत्न
प्रकृती स्थिर : घटनेने जिल्हाभरात खळबळ
लोकमत न्यूज नेटवर्क

Web Title: Former minister Gavitant's suicide attempt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.