वन अधिका:यांकडून तोरणमाळला स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 12:12 IST2019-11-19T12:12:31+5:302019-11-19T12:12:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शासकीय दौ:यानिमित्त तोरणमाळ ता.धडगाव येथे गेलेले मुख्य वनसंरक्षक पी.के.महाजन व ए.एस. कळसकर यांनी तेथील ...

वन अधिका:यांकडून तोरणमाळला स्वच्छता मोहीम
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शासकीय दौ:यानिमित्त तोरणमाळ ता.धडगाव येथे गेलेले मुख्य वनसंरक्षक पी.के.महाजन व ए.एस. कळसकर यांनी तेथील यशवंत तलावाच्या आजुबाजूला स्वच्छता मोहिम राबवली.
तोरणमालच्या यशवंत तलाव परिसरात प्लॅस्टीक व अन्य कचरा पडलेला होता. शासकीय दौ:यानिमित्त तेथे गेलेल्या वनविभागाच्या वरिष्ठ अधिका:यांनी तेथे स्वच्छता केली. यावेळी पी.के.महाजन व मा. ए.एस.कळसकर, व्ही.एस.शेळके, यु.जि. कडलग, एम.एन. कुलकर्णी, आर. एस. कदम, एस. बी. खैरनार, वनपाल डी.आर.केळकर वनरक्षक व्ही.सी.शिंदे, ए.बी.मोरे व ग्रामस्थ उपस्थित होते.
स्वच्छता मोहिम संपल्यानंतर साहेब यांनी ग्रामस्थांसोबत तोरणमाळ परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत चचर्ा करण्यात आली. दर गुरुवारी गावकरी दोन तास सर्व तोरणमाळ परिसरात स्वच्छता मोहिम राबविणार असल्याचा निर्धार ग्रामस्थांनी वयक्त केला. तसेच तोरणमाळ येथील येणारे पर्यटक यांनी जर कचरा कचराकुंडीच्या बाहेर इतरत्र टाकला तर त्यांना 100 रुपये दंड वसुल करण्यात यावा, असा ठरावही यावेळी करण्यात आला. स्वच्छता मोहिमेत सेवानिवृत्त मुख्य वनसंरक्षक देखील सहभागी झाले होते.
तोरणमाळ येथे ठिकठिकाणाहून असंख्य पर्यटक येत असतात. त्यांच्याकडून तेथे इतरत्र कचरा टाकला जातो. त्यामुळे तेथे स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होते. यावर मात करण्यासाठी इतरत्र कचररा टाकणा:यांना 100 रुपये दं आकारण्याचा निर्णय घे:यात आला.