वनविभागाने धाड टाकून जप्त केले सागवानी लाकूड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 13:19 IST2020-02-15T13:19:43+5:302020-02-15T13:19:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : तळोदा मेवासी वनविभागाच्या गस्ती पथकाने टोकणापिंप्री ता़ अक्कलकुवा येथे फर्निचर तयार करणाऱ्या कारखान्यात धाड ...

Forest Department seizes firewood and seizes saagawani wood | वनविभागाने धाड टाकून जप्त केले सागवानी लाकूड

वनविभागाने धाड टाकून जप्त केले सागवानी लाकूड

लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : तळोदा मेवासी वनविभागाच्या गस्ती पथकाने टोकणापिंप्री ता़ अक्कलकुवा येथे फर्निचर तयार करणाऱ्या कारखान्यात धाड टाकून सागवानी व शिसमचे लाकूड जप्त केले़ दीड लाखाच्या मुद्देमालासह पथकाने साहित्यही जप्त केले आहे़
अक्कलकुवा तालुक्यातील खापर वनक्षेत्रातील गुजरात हद्दीस लागू असलेल्या टोकणापिंप्री येथे एका घरात अवैध वृक्षतोड करुन लाकडांचा साठा करण्यात आल्याची माहिती तळोदा मेवासी वनविभागाचे सहायक वनसंरक्षक ई़बी़चौधरी यांना मिळाली होती़ त्यांनी अक्कलकुवा वनक्षेत्रपाल सोनानी गिरी गोसावी, तळोदा वनक्षेत्रपाल एऩजे़रोडे यांच्यासह अक्कलकुवा, खापर व तळोदा वनक्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे पथक तयार करुन टोकणापिंप्री येथे गस्त केली होती़ यादरम्यान टोकणपिंप्री येथे एका घरात पथकाला लाकडांचा साठा दिसून आला़ हा साठा जप्त करण्याची कारवाई सुरु असताना अज्ञात आरोपी पळून गेल्याची माहिती आहे़ याप्रकरणी वनगुन्हा दाखल करण्याची कारवाई पूर्ण करण्यात आली आहे़ अक्कलकुवा वनक्षेत्रात यंदाच्या वर्षात प्रथमच लाकूड जप्तीची कारवाई करण्यात आली आहे़ या भागात लाकूड तस्करांच्या कारवाया वाढल्याने ग्रामीण भागातून चिंता व्यक्त करण्यात येत होती़ वनविभागाने कारवाई करण्याची सातत्याने मागणीही होती़ लाकूड तस्कर गुजरात आणि महाराष्ट्र हद्दीचा लाभ घेत येथून पळ काढत असल्याची माहिती आहे़
ही कारवाई वनरक्षक एस़आऱदेसले, सचिन वाघ, फिलिप गावीत, एसक़े़वसावे, अविनाश गावीत, लिलावती पावरा, अनिता बागुल, डी़ एस़नागमल, अमोल पवार, एम़बी़जाधव, सायली सपकाळे, विनय गावीत, अनिल वळवी, नैना वसावे, एस़एऩमालचे, आऱएस़ बैरागी यांच्या पथकाने केली़

Web Title: Forest Department seizes firewood and seizes saagawani wood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.