वनविभागाला सापडले बिबट्यांच्या पायाचे ठसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 13:06 IST2020-08-07T13:06:07+5:302020-08-07T13:06:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : जुने वाण्याविहीर रोडवरील चौकटीवर बिबट्या दोन पिलासह गेल्या चार दिवसापासून मुक्तसंचार करीत आहे. गुरूवारी ...

वनविभागाला सापडले बिबट्यांच्या पायाचे ठसे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहीर : जुने वाण्याविहीर रोडवरील चौकटीवर बिबट्या दोन पिलासह गेल्या चार दिवसापासून मुक्तसंचार करीत आहे. गुरूवारी सकाळी वनपाल व वनरक्षकाच्या पथकाला वाण्याविहीर येथील उसाच्या क्षेत्रात पाहणीत करीत असताना बिबट्यासह पिल्लांच्या पायाचे ठसे आढळून आल्याने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या.
वाण्याविहीर येथील गणपती मंदिराच्या मागील भागात कन्हैयालाल परदेशी यांच्या उसाच्या शेतासह, जुने वाण्याविहीर चौकटी परिसरात गेल्या आठ दिवसापासून बिबट आपल्या दोन पिल्लांसह उसाच्या शेतात वास्तव्यास असून, या रस्त्यावरून जे-या करणाऱ्या अनेक नागरिकांनी या बिबटला प्रत्यक्ष उसाच्या शेतातून दुसºया शेतात जाताना पाहिले.
दरम्यान गुरूवारी सकाळी पुन्हा भाजीपाला विक्रेता मोटरसायकलीने जुने वाण्याविहीर चौकटीवरून येत असताना चौकटीजवळील पिपरीच्या झाडाजवळून बिबटला निघताना पाहिले. त्यानंतर वनविभागाचे वनपाल एल.एच. सांगळे, एम.डी. वसावे, संजयसिंग हजारी, वनरक्षक एस.आर. देसले, एस.एस. पावरा, एल.के. पावरा, एस.जी. गावीत यांच्या पथकाने सकाळी उसाच्या बांधांवर व रस्त्याच्या बाजूला लहान पिल्लांच्या पायासह मोठ्या पायाचे ठसे दिसल्याने त्याचे फोटो घेतले. या शेतातच बिबट असल्याचा अंदाज व्यक्त करीत बुधवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे शेताच्या बांधांवर चिखल सदृश्य स्थिती असल्याने सकाळी बिबटसह तिच्या पिल्लांनी मुक्त संचार केल्यामुळे पायाचे ठसे चिखलात उमटलेल्याचे दिसून आल्याने बिबटचे वास्तव्य असल्याने या मार्गावरून ये-जा करणाºया नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याच्या सूचना वनविभागातर्फे देण्यात आल्या आहेत.