पाच लाख फळझाडांमुळे बहरणार नंदुरबारचे वनक्षेत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 13:09 IST2019-05-05T13:07:57+5:302019-05-05T13:09:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पावसाकडून वेळावेळी दिल्या जाणा:या हुलकावणीमुळे वनक्षेत्रात लागवड केलेल्या झाडांची दुर्दशा टळावी यासाठी वनविभागाने कमी ...

The forest area of Nandurbar will grow due to five lakh fruit trees | पाच लाख फळझाडांमुळे बहरणार नंदुरबारचे वनक्षेत्र

पाच लाख फळझाडांमुळे बहरणार नंदुरबारचे वनक्षेत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पावसाकडून वेळावेळी दिल्या जाणा:या हुलकावणीमुळे वनक्षेत्रात लागवड केलेल्या झाडांची दुर्दशा टळावी यासाठी वनविभागाने कमी पाण्यावर तग धरणा:या झाडांची लागवड करण्याचा निर्णय घेतला आह़े यानुसार नंदुरबार, नवापूर आणि चिंचपाडा वनक्षेत्रात किमान पाच लाख फळझाडांची लागवड करण्यात येणार आह़े    
वनविभागाच्या ठाणेपाडा, नवापूर आणि चिंचपाडा परिसरातील सात रोपवाटिकांमध्ये झाडे तयार करण्याचे काम वेगाने सुरु आह़े प्रामुख्याने बाभूळवर्गीय झाडेच कमी पाण्यात तग धरत असल्याने त्या झाडांची लागवड करण्यात येणार आह़े गेल्या काही वर्षात पजर्न्याचे प्रमाण हे सातत्याने खालावत असल्याने वनक्षेत्रात लागवड करण्यात येणा:या झाडांच्या वाढीवर परिणाम झाल्याचे यंदा दिसून आले आह़े नंदुरबार वनक्षेत्रातील अक्राळे परिसरात 83 हजार झाडे जगवण्यासाठी पाणी देण्याचा प्रयोग वनविभागाने केला होता़ यातून ब:याच अंशी खर्चात वाढ झाली होती़ 2 लाख 34 हजार 445 चौरस किलोमीटर वनक्षेत्रापैकी जिल्ह्यात 2 लाख 12 हजार 681 चौरस किलोमीटर वनक्षेत्र हे संरक्षित असल्याने याठिकाणी यंदाच्या 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत किमान 55 लाख झाडे नव्याने लागवड करण्याचा उपक्रम शासनाकडून हाती घेण्यात आला आह़े यात नंदुरबार व नवापूर ताुलक्यात किमान 5 लाख रोपे ही फळझाडे असावीत असा प्रयत्न करण्यात येणार आह़े स्थानिकांना फळझाडांच्या माध्यमातून रोजगार मिळण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े यातून तृणभक्षी प्राण्यासह माकडांचा संचार वाढेल असे नियोजन वनविभागाकडून करण्यात येत आह़े
सातपुडय़ातील गावराणी आंब्याची मागणी गेल्या काही वर्षात वाढत आह़े या आंब्याचे संवर्धन होऊन त्याच्या उत्पादनात वाढ व्हावी या उद्देशाने वनविभागाच्या ठाणेपाडा रोपवाटिकेत 2 लाख गावराणी आंब्याची झाडे तयार करण्यात आली आहेत़ ही झाडे वनात लावण्यासह शाळा, आश्रमशाळा, ग्रामीण भाग आणि सेवाभावी संस्थांना वाटप करण्यात येणार आह़े यातून गावठी आंबा उत्पादन 5 वर्षानंतर दुप्पट होण्याचा दावा वनविभागाचा आह़े सोबत आवळा आणि सिताफळ ह्या झाडांची लागवड होणार आह़े किमान दीड लाख झाडांचे नियोजन करण्यात आले असून यातील 1 लाख रोपे तयार झाली आह़े लाकूड देणारे खैर, शिसू, बाभूळ, मोह, काशीद आणि गुलमोहरची रोपेही तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती देण्यात आली आह़े 
सामाजिक वनीकरण विभागाने 2017 मध्ये लागवड केलेल्या 62 हजार 750 झाडांना जीवदान मिळून त्यांची चांगली वाढ झाली होती़ 2018 मध्ये ही संख्या 1 लाख 31 हजार होती़ 200 किलोमीटरच्या रस्त्यासह चार गटलागवडीतून विभागाने केलेल्या कामामुळे 56 हजार झाडांची चांगल्या प्रकारे वाढ झाली होती़ 
वनविभागाने नंदुरबार आणि नवापूर तालुक्यात गेल्या वर्षात लागवड केलेल्या साडेतीन लाख झाडांपैकी 2 लाख 90 हजार झाडांची स्थिती ही मजबूत झाली आह़े सोबत नंदुरबार वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी ठाणेपाडा परिसरात बांबू बन विकसित करण्याचा निर्णय घेतला होता़ याठिकाणी बांबूची झाडे बाळसे धरत असून येत्या काळात येथेही फळझाडांची लागवड करण्याचा मानस विभागाचा आह़े येत्या पावसाळ्यासाठी खड्डे खोदण्यास मे महिन्यात सुरुवात होणार आहे.

Web Title: The forest area of Nandurbar will grow due to five lakh fruit trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.