वनक्षेत्रातील अतिक्रमणे काढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 12:54 IST2019-12-27T12:54:30+5:302019-12-27T12:54:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : तालुक्यातील खेकडा वनक्षेत्रात नव्याने केलेले दोघांचे अतिक्रमण वनविभागाकडून काढण्यात आले. संबंधितांना नोटिसा देण्यात आल्या ...

Forest area encroachments removed | वनक्षेत्रातील अतिक्रमणे काढली

वनक्षेत्रातील अतिक्रमणे काढली

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : तालुक्यातील खेकडा वनक्षेत्रात नव्याने केलेले दोघांचे अतिक्रमण वनविभागाकडून काढण्यात आले. संबंधितांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.
सहायक वनसंरक्षक नंदुरबार वनविभाग शहादा यांच्या आदेशाने वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे, चिंचपाडा येथील वनक्षेत्रपाल आर.बी. पवार यांच्यासह नवापूर व चिंचपाडा येथील कर्मचारी यांनी गायमुख परिसरात परिमंडळ खेकडामधील नियतक्षेत्र कारेघाट राखीव वनखंड क्रमांक-४३ मध्ये नव्याने साफसफाई करुन घरबांधणी करुन कैलास रतिलाल गावीत रा.खेकडा यांनी केलेले अतिक्रमण काढले.
वनविभागाची विहीत कोणतीही परवानगी न घेता वनकायदा तरतुदीचा भंग करणाऱ्या कैलास रतिलाल गावीत रा.खेकडा ता.नवापूर यांचेविरोधात खेकडा येथील वनपाल प्रकाश मावची यांनी वनगुन्हा क्रमांक- ०६/२०१९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. अतिक्रमण धारकास घरबांधणी अतिक्रमण काढून टाकण्यासाठी तीन नोटिसा देण्यात आल्या होत्या. खेकडा याच राखीव वनक्षेत्रात प्रलंबित दावा असलेले अतिक्रमणधारक रतिलाल नुत्या गावीत रा.खेकडा यांचेही अतिक्रमण क्षेत्रावरील दावा जिल्हास्तरीय समितीने नामंजूर केला असल्याने दोन्ही अतिक्रमण क्षेत्रातील अवैध घरबांधणी अतिक्रमण गॅस कटरने कापून पूर्ण घराचे अतिक्रमण वनविभागाने काढून टाकले. अतिक्रमण काढण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत संपविण्यात आली.
या कार्यवाहीत सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे, नवापूरचे वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे, चिंचपाडाचे वनक्षेत्रपाल आर.बी. पवार, वनपाल प्रकाश मावची, डी.के. जाधव, दयाराम वळवी, वनपाल अशोक पावरा, नितीन पाटील, कमलेश वसावे, संतोष गायकवाड, संजय पवार, तुषार नांद्रे, ए.जी. पावरा, अशोक पावरा, ईश्वर चौधरी, माजी सैनिक रवींद्र कासे, विशाल शिरसाठ, वाहन चालक तुंगार, नवापूर व चिंचपाडा वनक्षेत्रतील वनमजूर आदींनी सहभाग घेतला.

Web Title: Forest area encroachments removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.