पादचा:यास धडक देणा:यास दंडाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 11:56 IST2019-08-18T11:56:29+5:302019-08-18T11:56:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पादचा:यास धडक देवून त्याला जायबंदी करणा:या दुचाकी चालकास शहादा प्रथमवर्ग न्यायालयाने एक महिना कारावासाची ...

पादचा:यास धडक देणा:यास दंडाची शिक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पादचा:यास धडक देवून त्याला जायबंदी करणा:या दुचाकी चालकास शहादा प्रथमवर्ग न्यायालयाने एक महिना कारावासाची शिक्षा सुनावली.
जयसिंग मंशी रावताळे, रा.राखीखुर्द, ता.पानसेमल असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. चांदसैली ते लंगडी रस्त्यावर 9 फेब्रुवारी 2015 रोजी हा अपघात झाला होता. रावताळे यांनी आपली दुचाकी (क्रमांक एमएच 39 क्यू 4771) भरधाव चालवून पायी चालणा:या जबर धडक दिली होती. त्यात पादचारी नारायण ठोंबा पावरा हे गंभीर जखमी होऊन त्यांच्या पाय फॅर झाला होता.
याबाबत पावरा यांनी शहादा पोलिसात फिर्याद दाखल केली होती. त्यावरून जयसिंग रावताळे यांच्याविरुद्ध शहादा पोलिसात मोटार अपघातान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हवालदार मनोहर कोळी यांनी तपास करून शहादा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार यांच्या कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्या.ए.आर.शेंडगे यांच्या कोर्टात हा खटला चालला.
दोन्ही पक्षांचे युक्तीवाद ऐकुण न्या.शेंडगे यांनी दुचाकीचालक जयसिंग रावताळे यांना तीन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे अॅड.गणेश बागुल यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार हर्षल रोकडे होते.