दोन कोविड सेंटरसह क्वारंटाईन केंद्राचा भोजन खर्च १६ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 12:55 IST2020-07-30T12:55:05+5:302020-07-30T12:55:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाला संसर्गमुक्त करण्यासाठी कोविड कक्षांमध्ये दाखल करुन देखभाल केली जाते़ १४ ...

Food cost of quarantine center with two covid centers is 16 lakhs | दोन कोविड सेंटरसह क्वारंटाईन केंद्राचा भोजन खर्च १६ लाख

दोन कोविड सेंटरसह क्वारंटाईन केंद्राचा भोजन खर्च १६ लाख

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाला संसर्गमुक्त करण्यासाठी कोविड कक्षांमध्ये दाखल करुन देखभाल केली जाते़ १४ दिवसांपर्यंत दाखल रुग्णाला औषधींसोबतच योग्य भोजन देऊन प्रकृती बरी करण्यावर भर दिला जात आहे़ यातून नंदुरबार शहरातील दोन कोविड कक्ष आणि तीन क्वारंटाईन सेंटरमध्ये महिन्याकाठी १६ लाख रुपयांचा खर्च होत असून महिन्याकाठी किमान १० हजार थाळ्या जेवण हे बाधितांपर्यंत पोहोचते केले जात आहे़
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात नेत्रकक्ष आणि खामगाव रोडवरील एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल याठिकाणी कोविड कक्ष निर्माण करण्यात आले आहेत़ या कक्षांमध्ये निवासी उपचार घेणाऱ्या बाधिताला दर दिवशी सकाळी चहा, नाश्ता, दोन वेळ जेवण असा आहार दिला जात आहे़ हा आहार तयार करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाने ठेकेदाराची नियुक्ती केली असून त्याच्याकडून पॅकींग पद्धतीने हे अन्न पुरवण्यात येत आहे़ या अन्नाची गुणवत्ता तपासून ते रुग्णांपर्यंत पोहोचते करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाने दोन्ही ठिकाणी आहारतज्ञाची नियु्क्ती केली असून त्यांच्या सल्ल्यानुसारच दिवसाचा मेन्यू ठरवण्यात येऊन तशा प्रकारचे अन्न रुग्णांना देण्यात येत आहे़ कोरोनाबाधित आणि जनरल वॉर्ड असे दोन वॉर्ड जिल्हा रुग्णालयात असून याठिकाणी दरदिवशी रुग्णांची प्रकृती लवकर सुधारावी यासाठी आहाराची मोठी काळजी घेतली जात आहे़
कोविड कक्ष, जनरल वॉर्ड आणि क्वारंटाईन कक्षात दिलेले जाणारे अन्न पदार्थ हे निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या़ परंतु रुग्णालय प्रशासनाने या तक्रारी फेटाळल्या असून शासनाने ठरवून दिलेल्या ‘डाएट’नुसारच रुग्णांना जेवण देण्यात येत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे़

जिल्हा रुग्णालयाने ११५ रूपये थाळी याप्रमाणे भोजन तयार करुन देण्याचा ठेका दिला आहे़ यानुसार एकलव्य आणि जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्ष आणि जनरल वॉर्ड याठिकाणी भोजन दिले जात आहे़ जनरल वॉर्डात महिन्याकाठी ७ हजार २०० थाळ्या दिल्या जात आहेत़ तर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड कक्षात दिवसाला ७५ आणि एकलव्य स्कूलमधील कोविड कक्षात ८० थाळ्या वितरीत करण्यात येत आहे़ या जनरल वॉर्डसह दोन्ही कक्षांतील भोजनावर महिन्याकाठी १३ लाख रूपयांपर्यंत खर्च होत असल्याची माहिती देण्यात आली आहे़

या कक्षांमध्ये सकाळी चहा आणि नाश्ता, दुपारी देण्यात येणाºया जेवणात किमान दोन भाज्या, पोळ्या, दाळ आणि भात असा आहार दिला जातो़ सोबत दोनवेळ शेंगदाणा लाडू आणि अंडीही देण्यात येत आहे़
४दुसरीकडे क्वारंटाईन कक्षांसाठी २ लाख ७५ हजार रूपयांचा मासिक खर्च भोजनावर होत आहे़ तहसीलदार कार्यालयाने यासाठी ठेकेदार नियुक्त केला असून त्याच्याकडून तज्ञांच्या सल्ल्यानुसार भोजन दिले जाते़

जनरल आणि कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाºया रुग्णांना बरे करण्यासाठी आहारावर भर दिला जात आहे़ रोगप्रतिकारक क्षमता वाढीसाठी योग्य तो आहार देण्याचा चार्ट तयार केला आहे़ दरदिवशी त्यानुसार रुग्णांना अन्न पदार्थ दिले जात आहेत़
-डॉ़ तृप्ती नाईक, आहारतज्ञ, जिल्हा रुग्णालय, नंदुरबाऱ

क्वारंटाईन कक्षांमधील संपर्कात आलेल्यांना नियमित भोजन दिले आहे़ अन्न पदार्थांबाबत तीन तक्रारी आल्या होत्या़ त्या सोडवण्यात आल्या आहेत़ तूर्तास १५० रूपये थाळी याप्रमाणे क्वारंटाईन कक्षात जेवणाचा पुरवठा करण्यात येत आहे़
-भाऊसाहेब थोरात, तहसीलदार, नंदुरबाऱ

Web Title: Food cost of quarantine center with two covid centers is 16 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.