सरकारचे नियम आपल्या भल्यासाठीच, ते पाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 12:40 IST2020-04-14T12:40:13+5:302020-04-14T12:40:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनापासून वाचण्यासाठी घरातच राहून सरकारचे नियम पाळणे हाच खरा पर्याय असून शासनाच्या सूचना आपल्या ...

Follow the rules of the government for your own good | सरकारचे नियम आपल्या भल्यासाठीच, ते पाळा

सरकारचे नियम आपल्या भल्यासाठीच, ते पाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनापासून वाचण्यासाठी घरातच राहून सरकारचे नियम पाळणे हाच खरा पर्याय असून शासनाच्या सूचना आपल्या सर्वांच्या भल्यासाठी आहेत़ ते पाळा असे आवाहन करीत खासदार डॉ़ हीना गावीत यांनी आपण वयाने लहान असलो तरी या संकटाच्या काळात मतदारसंघातील पालकत्त्वाचे भान असून त्यासाठी आपण तत्पर असल्याची ग्वाही ‘लोकमत’शी बोलताना दिली़
कोरोना संदर्भातील उपाययोजना व जनजागृतीच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ़ गावीत बोलत होत्या़ त्यांनी सांगितले की, आपला मतदारसंघ गुजरात आणि मध्यप्रदेश सीमेवर असल्याने अनेक खबरदारीच्या उपाययोजना आवश्यक आहेत़ त्यादृष्टीने सुरु आहेत़ राज्यांच्या सीमा सील केल्या असून दुसऱ्या राज्यातील व्यक्तींना तसेच दुसºया जिल्ह्यातील व्यक्तींनाही प्रवेश बंदी करण्यात आली आहे़ मतदारसंघातील गावांमध्ये फिरुन कोरोनापासून घ्यावयाची काळजी संदर्भात लोकांना माहिती देत आहे़ त्याचबरोबर या काळात लोकांच्या समस्याही वाढल्या आहेत़ त्या सोडवण्या संदर्भात प्रशासनाला सूचनाही दिल्या आहेत़
प्रश्न:- एक डॉक्टर म्हणून आपल्याला या काळात काम करताना काय फायदा होत आहे़
उत्तर:- निश्चितच लोकांना कोरोनाची साखळी तोडण्यासाठी काय केले पाहिजे व काय करु नका ते योग्य पद्धतीने समजावून सांगता येत आहे़ विशेषत: मुंबई येथे जेजे रुग्णालयात आपण निवासी वैद्यकीय अधिकारी असताना स्वाईन फ्ल्यूची साथ होती़ ते प्रकरण आपण हाताळले आहे़ त्याचाही अनुभव असल्याने डॉक्टरांनाही त्याबाबत सूचना देताना व त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी त्याचा फायदा होत आहे़
प्रश्न:- मतदारसंघातील लोकांनी अजून काय काळजी घेतली पाहिजे असे आपल्याला वाटते़
उत्तर:- सध्या भाजीविक्रेत्यांच्या संख्येत वाढ झाली आहे़ त्यामुळे प्रत्येक विक्रेत्याने मास्क लावले पाहिजे़ याची सूचना आपण दिली आहे़ त्याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे़ जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या असल्या तरी अजूनही छुप्या पद्धतीने काही मजूर वर्ग, नोकरवर्ग येत आहे़ अर्थात प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अडचणी आहेत़ परंतू आहे त्या ठिकाणीच सर्वांनी थांबणे यातच सर्वांचे हित आहे़ कारण त्यातून स्वत:ला व इतरांना धोका उद्भवू शकतो़ लॉकडाऊनच्या काळात वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी हे सतत बाहेर आहेत़ लोकांची ते काळजी घेत आहेत़ त्यामुळे त्यांचीही काळजी घेणे आवश्यक असून त्यांनीही स्वत: काही गोष्टी पाळण्याची गरज आहे़
प्रश्न:- एक लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या आपल्याकडे अनेक अपेक्षा आहेत़ त्यासाठी आपण काय करीत आहात़
उत्तर:- मी या मतदार संघाची खासदार आहे़ याची मला जाण आहे़ त्यामुळे वयाने लहान असली तरी पालकत्त्वाची जबाबदारी निश्चितच घेऊन त्यादृष्टीने काम करीत आहे़ या काळात मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात जाऊन आपण आढावा बैठका घेतल्या, लोकांशी संपर्क केला़ सोशल डिस्टन्सिंगबाबत जनजागृती केली़ विशेषत: लॉकडाऊनमुळे अनेकांचे नातेवाईक इतर राज्यात व परदेशातही अडकले आहेत़ त्यांचेही प्रश्न सोडवण्याबाबत प्रयत्न होत आहे़ ते ज्या भागात राहतात़ त्या भागात सुरक्षित रहावेत व त्यांना सुविधा मिळाव्यात यासाठी सातत्याने संपर्क सुरु आहे़ विदेशात असणाºया नागरिकांबाबतही परराष्ट्रमंत्री व त्या-त्या देशातील राजदूतांसोबत बोलून त्या भागात लोकांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत़
आपल्या भागात प्रशासनाने चांगले काम केल्याने आणि लोकांनीही नियम पाळल्याने आतापर्यंत कोरोनाला रोखण्यासाठी आपण यशस्वी झालो़ यापुढेही हीच खबरदारी आपल्याला घ्यायची असून कोरोनामुक्त जिल्ह्याची ओळख कायम ठेवायची आहे़ त्यासाठी जनतेनेही सहकार्य करावे, असे आवाहन खासदार डॉ़ हीना गावीत यांनी केले़

Web Title: Follow the rules of the government for your own good

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.