आरतीला पाच लोक बोलावून नियमांचे पालन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 13:15 IST2020-08-24T13:15:37+5:302020-08-24T13:15:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनामुळे साधेपणाने साजरा होणाऱ्या गणेशोत्सवात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे सूचित केले जात ...

आरतीला पाच लोक बोलावून नियमांचे पालन
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनामुळे साधेपणाने साजरा होणाऱ्या गणेशोत्सवात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे सूचित केले जात आहे़ शासनाच्या सूचनेनुसार मंडळांनी उपाययोजना केल्या असून विविध उपाययोजनांवर भर दिल्याचे दिसून येत आहे़
‘लोकमत’ने शहरातील श्री स्वामी विवेकानंद युवक मंडळाच्या सायंकाळच्या आरतीला हजेरी देत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला़ यावेळी येणाºया पदाधिकारी आणि भाविकांना सॅनेटायझर, सोशल डिस्टन्सिंगसाठी सर्कल करणे, एकमेकांपासून अंतर राखून मास्कचा वापर करणे आणि केवळ पाचच लोकांना आरती साठी पाचारण करणे आदी उपाययोजना करण्यात आल्याचे दिसून आले़ मंडळांकडून यंदा चार फूटांपेक्षा कमी उंचीची मूर्ती स्थापित करण्यात आली आहे़ यंदाचे मंडळाचे ३६ वे वर्ष आहे़ मंडळांकडून दरवर्षी विविध समाजोपयोगी उपक्रम साजरे करण्यात येत होते़ यंदा सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत़ छोटासा पेंडॉल करुन त्यासमोर भाविकांना सोयीचे होईल असे सर्कल करुन देत दर्शनाची व्यवस्था आहे़ गावातील मानाचा गणपती असल्याने दर्शनासाठी विविध लोक येतात़ त्यांना लांबून दर्शन घेता यावे साठी सूचना फलकही येथे लावला आहे़
शासनाच्या नियमानुसार यंदा उत्सव साजरा करण्यात येत आहे़ कमीत कमी लोकांना पेंडॉल परिसरात प्रवेश दिला जातो़ सॅनेटायझर मशिन लावून सोय करुन करुन दिली आहे़
-दिनेश विठ्ठल दातीर, उपाध्यक्ष, स्वामी विवेकानंद मित्र मंडळ, नंदुरबाऱ
मंडळाकडून भाविकांसाठी सॅनेटायझर मशिन लावले गेले आहे़ या स्वयंचलित मशीनसमोर हात गेल्यानंतर त्यातून सॅनेटायझरचा शिडकावा होतो़ सकाळच्यावेळी महिला तर सायंकाळी परिसरातील पुरूष मंडळी सोशल डिस्टन्सिंग ठेवत आरती करत असल्याची माहिती देण्यात आली़ ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी यंदा लाऊड स्पीकरचाही वापर बंद आहे़