अपघातातील मृतांवर अंत्यसंस्कारामुळे शहाद्यातील अमरधाममध्ये अश्रूंचा महापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 12:51 IST2019-08-20T12:51:26+5:302019-08-20T12:51:31+5:30

सुनील सोमवंशी ।  लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : रविवार, 18 ऑगस्ट 2019 शहाद्याच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून या दिवसाची ...

A flood of tears broke out at the Martyrs' Amardham due to the funeral of the deceased | अपघातातील मृतांवर अंत्यसंस्कारामुळे शहाद्यातील अमरधाममध्ये अश्रूंचा महापूर

अपघातातील मृतांवर अंत्यसंस्कारामुळे शहाद्यातील अमरधाममध्ये अश्रूंचा महापूर

सुनील सोमवंशी । 
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : रविवार, 18 ऑगस्ट 2019 शहाद्याच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून या दिवसाची नोंद इतिहासात होईल.. शिंदखेडा तालुक्यातील निमगूळ गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात शहाद्यातील एक-दोन नव्हे तर तब्बल आठ प्रवाशांचा करुण अंत झाला.
दरवर्षी रिमङिामणा:या पावसात सण-उत्सव साजरा होणा:या ऑगस्ट महिन्याने यंदा मात्र शहादेकरांवर दु:खाची संक्रांत आणली. गेल्याच पंधरवडय़ात संततधार पावसाने तालुक्याला अक्षरश: झोडपून काढले. पावसाच्या पुराने संपूर्ण तालुका होरपळला गेला. अनेक घरांमध्ये  पाणी घुसल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. शेतात पाणी घुसल्याने उभ्या पिकांचे नुकसान झाले. या पुराने तीन-चार बळी घेतले. सुमारे 40 जनावरे दगावली. शहाद्याच्या या आपत्तीचे निवारण होत नाही तोच रविवारची ही मोठी दुर्घटना घडल्याने शहादेकरांवर लागोपाठ झालेल्या या दुस:या आघाताने संपूर्ण तालुका सुन्न झाला आहे.
नेहमीची शहादा आगाराची औरंगाबाद-शहादा ही बस शहाद्याकडे येत असताना निमगूळ गावाजवळ बसला समोरुन येणा:या कंटेनरने जोरदार धडक दिली. काही वेळातच आपण शहाद्याला पोहोचू आणि आपला प्रवास संपेल असे स्वप्न बाळगून शहाद्याकडे निघालेल्या या प्रवाशांचा निमगूळ गावाजवळच अवघ्या संपूर्ण जीवनाचाच प्रवास संपल्याची घटना घडली. बसचालकासह शहादा येथील तब्बल   आठ प्रवासी या अपघातात दगावल्याने शहादेकरांवर दु:खाची काळी छाया पसरली आहे. एकाच कुटुंबातील आई आणि मुलगा, काकू आणि पुतण्या यांचा समावेश आहे. प्रेरणा श्रीराम वंजारी व त्यांचा मुलगा सौरभ श्रीराम वंजारी हे दोघेही अपघातात ठार झाले. सौरभ हा येथील शेठ व्ही.के. शहा विद्यालयातील नववीचा विद्यार्थी होता. शाळेतील चुणचुणीत असा विद्यार्थी वर्गाचा मॉनीटर होता. व्हालंटरी शाळेच्या विद्यार्थीप्रिय शिक्षिका वृषाली दीपक भावसार व त्यांचा आठवीतील पुतण्या तेजस जगदीश भावसार या एकाच कुटुंबातील दोघेही या अपघातात दगावले. शहाद्यातील केळीचे  व्यापारी शकील महंमद बागवान, एस.टी.  बसचालक मुकेश नगीन पाटील, शिरुड दिगरचे संजय ताराचंद अलकरी, शहाद्यातील व्यापारी सुयोग बन्सीलाल नहाटा यांचेही या अपघातात दुर्दैवी निधन झाले.
अपघातात दगावलेल्या सर्वावर शहादा अमरधाममध्ये अंत्यविधी करण्यात आला. अंत्यविधीसाठी अक्षरश: नंबर लावावे लागले. मृतांचे नातेवाईक आणि शहादेकर शोकाकूल नागरिकांनी अमरधामकडे धाव घेतल्याने एवढे प्रशस्त अमरधामही आज लोकांच्या उपस्थितीने हाऊसफुल्ल झाले होते. संपूर्ण शहरावर शोककळा पसरल्याने अमरधाममध्ये पाय ठेवायलाही जागा नव्हती. अंत्यसंस्कारासाठी शोकाकूल कुटुंबीयांना प्रतीक्षा करावी लागली. अमरधाममधील हे दृष्य सर्वाच्याच डोळ्यात पाणी आणणारे होते. शहाद्याच्या इतिहासात हा दिवस काळा दिवस म्हणूनच ओळखला जाईल.
 

Web Title: A flood of tears broke out at the Martyrs' Amardham due to the funeral of the deceased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.