विविध मान्यवरांच्या हस्ते ध्वजवंदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:36 IST2021-08-18T04:36:20+5:302021-08-18T04:36:20+5:30
नंदुरबार येथील डी.आर. हायस्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनी नंदुरबार एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. पी. एम. मोडक, उपाध्यक्ष नरेंद्र सराफ, कार्याध्यक्ष जी.व्ही. ...

विविध मान्यवरांच्या हस्ते ध्वजवंदन
नंदुरबार येथील डी.आर. हायस्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनी नंदुरबार एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. पी. एम. मोडक, उपाध्यक्ष नरेंद्र सराफ, कार्याध्यक्ष जी.व्ही. खुण्टे, सचिव प्रशांत पाठक व पदाधिकारी यांच्या हस्ते शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक पी. डी. पिंपळे,उपमुख्याध्यापक एन.के. भदाणे, डाॅ. काणे गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका भारती सूर्यवंशी, डॉ.काणे विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका सुलभा महिरे शाळेतील सर्व पदाधिकारी तसेच सर्व शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
शहाद्यात रक्तदान शिबिरशहादा येथे सद्गुरु बाबा गुरूबचन सिंगाजी महाराज यांचे बलिदान व भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने संत निरंकारी चॅरिटेबल संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी १६८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाचे उद्घाटन शहादा उपविभागीय प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी धुळे झोनचे झोनल प्रमुख हिरालाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन येथे करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांच्या उपस्थित करण्यात आले. शिबिरात एकूण १६८ जणांनी रक्तदान केले. संत निरंकारी बाबा संस्थानच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. याप्रसंगी शहादा शाखेचे मोहनलाल आहुजा व सेवादल संचालक, संजय निकुंभे, रावसाहेब बाविस्कर, पीतांबर चव्हाण, इंद्रकुमार भकत्यापुरी, गणेश पाटील, डॉ. रवींद्र अहुजा, हरीश चिमनानी, आणि राजेंद्र साळी शहादा सेवादल युनिट १००८ चे सर्व सेवादल सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले. याकामी शासकीय वैद्यकीय रुग्णांलय नंदुरबार यांचे सहकार्य लाभले.
तोरखेडा
तोरखेडा, ता.शहादा येथे विविध ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. सर्वप्रथम सु.भ.क माध्यमिक विद्यालयात पर्यवेक्षक बागुल, जिल्हा परिषद शाळेत महेंद्र कुमावत, इंग्लिश मीडियममध्ये सरपंच मनीषा गरूड, विविध कार्यकारी सोसायटीत किशोर घोरपडे, पोलीस दूरक्षेत्रात पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी, पीक संरक्षण सोसायटीत सुधाकर चौधरी, झेंडा चौकात स्वातंत्र्यसेनानी संभाजीराव गरूड यांच्या विधवा पत्नी उषादेवी संभाजीराव गरूड यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी, सरपंच मनीषा गरूड, उपसरपंच रामोळे, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस दूरक्षेत्राच्या कर्मचारींसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद मराठी शाळेत वृक्षरोपण करण्यात आले. याप्रसंगी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, मुख्याध्यापक दत्तात्रेय पाटील, समाधान पाटील, संदीप भदाणे, दगडू नाईक, अनिता देवरे, जयश्री पाटील उपस्थित होते.