तळोदा तालुक्यातून पाच हजार मीटर वीज तार चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 12:56 IST2019-10-15T12:56:03+5:302019-10-15T12:56:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : तळोदा तालुक्यातील बोरद, मोड, खेडले, धानोरा शिवारातून पाच हजार मीटर वीजतार चोरीला गेल्याचा प्रकार ...

तळोदा तालुक्यातून पाच हजार मीटर वीज तार चोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरद : तळोदा तालुक्यातील बोरद, मोड, खेडले, धानोरा शिवारातून पाच हजार मीटर वीजतार चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आह़े यातून कृषीपंपांचा वीज पुरवठा गेल्या आठवडय़ापासून बंद पडला आह़े
गेल्या आठवडय़ात मोड येथील प्रकाश फकिरा पाटील, इंद्रसिंग राजपूत, पुरूषोत्तम शिंपी, कढेल येथील अरूण बुलाखी पाटील, सुभाष भगवान पाटील, खेडले येथील भरत पाटील, चंद्रकांत पाटील, शरद पाटील, कांतीलाल पाटील आदींच्या शेतातील खांबावरील वीज अज्ञात चोरटय़ांनी चोरुन नेल्याचे दिसून आले होत़े याप्रकारामुळे एकच खळबळ उडाली होती़ दरम्यान वीज कंपनीला माहिती दिल्यानंतर त्यांनी तारेची मोजदाद केल्यावर पाच हजार मीटर तार चोरीला गेल्याचे समोर आले आह़े
शेतक:यांनी वीज वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता सचिन काळे यांना याबाबत माहिती दिली होती़ वीज कंपनीने शेतक:यांचा वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात येत आह़े चोरीबाबत शेतक:यांनी तळोदा पोलीसात माहिती दिली होती़ तारचोरीची घटना ताजी असताना तळोदा तालुक्यातील मोड शिवारात दोन शेतक:यांचा प्रत्येकी सहा क्विंटल कापूस अज्ञात चोरटय़ांनी लंपास केल्याची घटना घडली आह़े सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शेतक:यांनी तळोदा पोलीस ठाण्यात धाव घेतली होती़ सणासुदीच्या काळात बारा क्विंटल कापसाची चोरी झाल्याने दोघे शेतकरी हताश झाले होत़े