चार दिवसात अडीच हजार हेक्टरचे पंचनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 12:26 IST2019-11-07T12:26:08+5:302019-11-07T12:26:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सारंगखेडा ता़ शहादा येथे जिल्ह्यातील सर्व प्रशासनातील अधिका:यांची आढावा बैठक ...

चार दिवसात अडीच हजार हेक्टरचे पंचनामे
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सारंगखेडा ता़ शहादा येथे जिल्ह्यातील सर्व प्रशासनातील अधिका:यांची आढावा बैठक रविवारी घेली होती़ बैठकीत त्यांनी शुक्रवारी पंचनामे पूर्ण करुन शनिवारी चावडी वाचन करण्याचे आदेश दिले होत़े परंतू चार दिवस उलटल्यानंतरही जिल्ह्यात केवळ अडीच हजार हेक्टर क्षेत्रातच पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आह़े
कृषी, महसूल आणि ग्रामविकास विभागाच्या अधिका:यांनी संयुक्तपणे करावयाच्या या पंचनाम्यांना गती मिळत नसल्याने शेतक:यांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े विशेष म्हणजे शासनाने कोरड, बागायती, बहुवार्षिक अशा कोणत्याही पिकाचे नुकसान झाल्यास सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले असताना अनेक ठिकाणी केवळ धान्य पिकांचे पंचनामे आधी करुन कारवाई केली जात असल्याचा आरोप शेतक:यांकडून होत आह़े पथकांकडून कापसात नत्र असल्याने पाने लाल झाली, कीडरोग आणि पावसाची मोजणी करुन पंचनामे केले जात असल्याचे शेतक:यांनी सांगितले आह़े परंतू अवकाळीमुळे नुकसान झाल्याने नुकसान या एकाच व्याख्येत पंचनामे होणे गरजेचे असताना तशा प्रकारची कारवाई होत नसल्याने शेतकरी संतप्त प्रतिक्रिया देत आहेत़
नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये गेलेल्या पथकांना शेतक:यांचा या रोषाचा सामना करावा लागला असून जिल्हा प्रशासनाने याकडे गांभिर्याने लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आह़े ब:याच ठिकाणी अद्यापही पंचनाम्यांचे पथक पोहोचलेले नसल्याने शेतक:यांनी आंदोलनाचा इशाराही दिला आह़े
महसूल आणि कृषी विभागाच्या पथकांनी आतार्पयत जिल्ह्यातील 2 हजार 437 हेक्टरवर पंचनामे पूर्ण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े एकूण 4 हजार 916 शेतक:यांच्या मालकीच्या क्षेत्रात कापसासह खरीप धान्य व तेलबिया पिकांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आह़े जिल्ह्यात सर्व तालुक्यात नुकसानीची माहिती मिळत असल्याने तालुकास्तरावरुन तहसीलदार दरदिवशी सूचना करत असल्याची माहिती देण्यात आली आह़े
आसाणे परिसरात पंचनाम्यांना टाळाटाळ
नंदुरबार : तालुक्यातील आसाणे, घोटाणे, रनाळे परिसरातील शेतक:यांना अवकाळीचा फटका बसला आह़े या ठिकाणी पंचनामे करण्यास टाळटाळ होत असल्याची तक्रार शेतक:यांनी निवेदनाद्वारे केली आह़े तहसीलदार यांना हे निवेदन देण्यात आले आह़े
निवेदनात आसाणे, घोटाणे, रनाळे परिसरातील गावांमध्ये यंदा पावसाळ्यात अतीवृष्टी झाली आह़े गेल्या आठवडय़ातही अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतक:यांची पिके पूर्णपणे खराब झाली आहेत़ यातून काही शेतक:यांनी कापूस आणि इतर पिकांचा विमा करुन घेतला आह़े अवकाळीचे नुकसान झाल्यानंतर शेतक:यांनी टोल-फ्री क्रमांकावर संपर्क करुन माहिती देण्याचा प्रयत्न केल्यानंतर कोणत्याही विमा प्रतिनिधीने त्यांची मदत केलेली नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आह़े नुकसान झाल्यानंतर विमा कंपनीच्या प्रतिनिधीने येऊन पाहणी करणे गरजेचे असल्याचे शेतक:यांचे म्हणणे आह़े शेतशिवारात अवकाळीमुळे पडून असलेल्या पिकात अळ्या पडण्यासह धान्यात कोंब फुटले आहेत़ यामुळे पंचनामे करण्याची मागणी आह़े पंचनामे करुन तातडीने नुकसान भरपाई देण्याची कारवाई न झाल्यास या गावांमधील शेतकरी आंदोलन करतील असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आल आह़े निवेदनावर किसन रुपचंद पाटील, समाधान किसन पाटील, रविंद्र पाटील, विजय पाटील, किरण पाटील यांच्यासह शेतक:यांच्या सह्या आहेत