शहाद्यात पाच लाखाचा गुटखा जप्तीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 12:07 IST2019-06-21T12:07:36+5:302019-06-21T12:07:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : दोंडाईचा-शहादा रस्त्यावर सावळदा फाटय़ाजवळ मालवाहू वाहन संशयास्पदरित्या उभे असल्याची माहिती शहादा पोलीसांना मिळाली होती़ ...

Five lakhs of gutka seizure action in Shahada | शहाद्यात पाच लाखाचा गुटखा जप्तीची कारवाई

शहाद्यात पाच लाखाचा गुटखा जप्तीची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : दोंडाईचा-शहादा रस्त्यावर सावळदा फाटय़ाजवळ मालवाहू वाहन संशयास्पदरित्या उभे असल्याची माहिती शहादा पोलीसांना मिळाली होती़ पोलीसांनी भेट देत तपासणी केली असता, त्यात पाच लाखाचा गुटखा मिळून आला़ 
गुरुवारी सकाळी 11 वाजता माजी नगरसेवक अशोक मकरंदे व शिवसेनेचे धनराज पाटील यांनी पोलीसांना दोंडाईचा रोडवर एमएच 18-बीजी 2880 हे  मालवाहू वाहन उभे असल्याची माहिती दिली होती़ पोलीसांनी याठिकाणी तातडीने भेट देऊन पाहणी केली असता आतील भागात बंदी असलेला पान मसाला, सुगंधी तंबाखू याचे खोके आढळून आल़े एकूण पाच लाख 28 हजार रुपयांचा गुटखा आणि दोन लाख रुपयांचे मालवाहू वाहन पोलीस ठाण्यात आणले गेल़े याठिकाणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी दिनेश तांबोळी यांना माहिती देऊन बोलावण्यात आल़े त्यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होत़े पोलीसांनी चालक सादिक मंसूरी रा़ निसरपुर मध्यप्रदेश यास अटक केली आह़े 
 

Web Title: Five lakhs of gutka seizure action in Shahada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.