पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 12:08 IST2019-09-28T12:07:58+5:302019-09-28T12:08:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील वावद येथील माहेर तर शिंदखेडा तालुक्यातील वाघोदा येथील सासर असलेल्या विवाहितेचा 5 लाख ...

पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील वावद येथील माहेर तर शिंदखेडा तालुक्यातील वाघोदा येथील सासर असलेल्या विवाहितेचा 5 लाख रुपयांसाठी छळ केल्याच्या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
निताबाई हरी पाटील यांनी वावद येथील माहेरुन चारचाकी गाडी आणि पोल्ट्री फार्म टाकण्यासाठी पाच लाख रुपये आणून द्यावेत यासाठी पती हरी बळीराम पाटील याच्याकडून छळ सुरु होता़ याकारणातून वेळोवेळी हरी पाटील हा विवाहितेला मारहाण करत होता़ 1997 पासून सुरु असलेल्या या प्रकाराला कंटाळून निताबाई यांनी गुरुवारी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली होती़
याप्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरुन पती हरी पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सोनवणे करत आहेत़