डाळिंब विक्रीचे पावणेतीन लाख बुडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:58 IST2021-02-06T04:58:34+5:302021-02-06T04:58:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : डाळींब विक्रीचे दोन लाख ८८ हजार रुपये न देता फसवणूक केल्याप्रकरणी सटाणा, जि.नाशिक येथील ...

Five lakh pomegranates were sold | डाळिंब विक्रीचे पावणेतीन लाख बुडविले

डाळिंब विक्रीचे पावणेतीन लाख बुडविले

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : डाळींब विक्रीचे दोन लाख ८८ हजार रुपये न देता फसवणूक केल्याप्रकरणी सटाणा, जि.नाशिक येथील व्यापाऱ्याविरुद्ध म्हसावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माधव गुलाब दुसाणे, रा.धांदोरीपाडा, ता.सटाणा असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत फत्तेपूर येथील पटेलवाडी येथे राहणारे डॅा.उल्हास विश्वनाथ पाटील यांनी व्यापारी माधव दुसाणे यांना नऊ हजार २३५ किलो डाळिंब ३७ रुपये किलोप्रमाणे विक्री केले होते. त्याचे तीन लाख ३८ हजार रुपये इतकी रक्कम झाली होती. त्यातील ९१ हजार ६२२ रुपये दिले होते. उर्वरित दोन लाख ८८ हजार ३७८ रुपये व गाडी भाड्याचे ४२ हजार रुपये आतापर्यंत परत केले नाही. वेळोवेळी मागणी केल्यावर दोन लाख रुपयांचा चेक देण्यात आला. परंतु तो देखील वटला नाही.

त्यामुळे दुसाणे यांनी आपली फसवणूक केल्याचा संशय डॅा.उल्हास पाटील यांना आल्याने त्यांनी म्हसावद पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून माधव दुसाणे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार सुनील बिऱ्हाडे करीत आहे.

Web Title: Five lakh pomegranates were sold