तळोदा पोलिसांकडून पाच लाखांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 13:01 IST2020-08-09T13:01:00+5:302020-08-09T13:01:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू होणाऱ्या संचारबंदीत नियमांचे उल्लंघन करुन फिरणाऱ्यांवर तळोदा पोलीस ठाण्याकडून कारवाई करण्यात ...

तळोदा पोलिसांकडून पाच लाखांचा दंड वसूल
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू होणाऱ्या संचारबंदीत नियमांचे उल्लंघन करुन फिरणाऱ्यांवर तळोदा पोलीस ठाण्याकडून कारवाई करण्यात आली होती़ कारवाईनंतर बेशिस्तांना दंड करण्यात येऊन त्यापोटी ५ लाख रूपयांची दंड वसूली करण्यात आली आहे़
पोलीस निरीक्षक राजेंद्र शिंगटे यांच्या मार्गदर्शनात ही कारवांई करण्यात आली होती़ २९ एप्रिल ते आजअखेरीस पोलीसांनी ६२२ जणांवर कारवाई केली होती़ यातून ५ लाख ३२ हजार रूपयांची वसुली करण्यात आली आहे़ यात प्रामुख्याने मास्क न लावणे, सोशल डिस्टन्सिंग न करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे आदी मनाई आदेशांचे उल्लंघन करणाºयांवर कारवाई करण्यात आली होती़ मास्कअभावी फिरणाºया २२४ जणांवर पोलीसांनी कारवाई करुन त्यांच्याकडून दोन लाख २४ हजार रूपये, तर दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंग न करता गर्दी करणाºयांवर ५८९ केसेस नोंदवल्या गेल्या होत्या़ यातून दोन लाख ९४ हजार ५०० रूपयांच्या दंडाची वसुली पोलीस कर्मचाºयांनी केली आहे़ सोबत सार्वजनिक जागी सोशल डिस्टन्सिंग न करणाºया सात जणांवर कारवाई करुन १० हजार ५०० आणि सार्वजनिक जागी थुंकणाºया दोन जणांवर कारवाई करत १ हजार रूपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली आहे़ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात जिल्हाधिकाºयांनी काढलेल्या आदेशानुसार दुकानांच्या वेळा आणि रविवार कर्फ्यूचे पालन करण्यात येत आहे़ निर्धारित वेळेनंतर भटकंती करणारे तसेच रात्री अपरात्री शहरात दिसून येणाºया टारगटांवरही कारवाई केली जात आहे़ पोलीस प्रशासनाने शहरातील विविध भागात रात्री आणि रविवारी गस्त सुरू केली असून नियमांचा भंग करणाºयांना समज दिली जात आहे़ दरम्यान, तळोदा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया गावांमध्ये कोरोनाला रोखण्यासाठी जनजागृतीवर भर दिला जात असल्याचे पोलीस निरीक्षक राजेश शिंगोटे यांनी सांगितले.