शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
2
भारतासोबतचा पंगा तुर्कस्तानच्या अंगलट आला! एक महिन्यात कोट्यवधीच नुकसान झालं
3
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...
4
Malegaon Factory Election Result: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
5
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती  
6
नेहा त्याला भाऊ मानायची, पण तौफीकला लग्न करायचं होते, त्यामुळे त्याने...; कुटुंबाचा दावा
7
मुंबईमध्ये नऊ कोटींचे सोने जप्त, सोने वितळवणाऱ्या ७ जणांना अटक, असे करायचे काम
8
ओसाड वाळवंट असलेला कतार कसा झाला श्रीमंत देश! ५० वर्षांपूर्वीची 'ती' घटना, जिने बदलून टाकलं सारं चित्र!
9
Guru Purnima 2025: प्रत्येकाने आयुष्यात गुरु का केले पाहिजे? त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान जाणून घ्या!
10
Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराह कुठले सामने खेळणार? कर्णधार शुबमन गिलने लगेचच दिलं उत्तर, म्हणाला- "मोठा ब्रेक..."
11
सोलापूरात विमान लँड होताच समोर आला कुत्रा; पायलटची उडाली भंबेरी, सुरक्षा रक्षकही धास्तावले
12
PF Withdrawal : ना फॉर्मची चिंता ना कुठे जाण्याचं टेन्शन; EPF खात्यातून UPI द्वारे काढू शकता पैसे, आली मोठी अपडेट
13
ओरिजनल काय आहे का? सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक नाराज
14
Mumbai Rain Updates: मुंबईत पावसाची नाइट शिफ्ट; दिवसा ब्रेक; भांडुपमध्ये भिंत कोसळली
15
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
16
आषाढारंभ:आषाढापासून ४ महिने आध्यात्मिक वातावरण आणि सण, उत्सव, व्रत, वैकल्याची रेलचेल!
17
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
18
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
19
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
20
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?

मयतांच्या कुटूंबियांना पाच लाखाची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 12:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : धडगाव तालुक्यातील खडकी पॉईंट येथे झालेल्या वाहन अपघातात मृत व्यक्तींना सर्वतोपरी मदत करण्यात येईल ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : धडगाव तालुक्यातील खडकी पॉईंट येथे झालेल्या वाहन अपघातात मृत व्यक्तींना सर्वतोपरी मदत करण्यात येईल आणि जखमी व्यक्तींवर आवश्यक उपचार करण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी. पाडवी यांनी केले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी मयतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखाची मदत जाहीर केली.जिल्हा शासकीय रुग्णालय येथे खडकी येथील अपघातातील जखमींची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतल्यानंतर ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, जि.प. समाज कल्याण सभापती रतन पाडवी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.के.डी. सातपुते उपस्थित होते. ॲड.पाडवी म्हणाले, झालेली दुर्घटना अत्यंत दुर्र्दैवी आहे. जखमींवर उपचार करून त्यांचे प्राण वाचविण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. आवश्यकता भासल्यास खासगी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. मृत प्रवासी गरीब कुटुंबातील होते आणि त्यात पाच महिलांचा समावेश असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना आणि जखमींना आर्थिक सहाय्य देण्याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. अशा दुर्घटना भविष्यात होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.पालकमंत्र्यांनी जखमींच्या प्रकृतीची माहिती घेतली आणि त्यांनी धीर दिला. जखमी व्यक्तींच्या उपचारात कोणतीही कमतरता ठेवू नये, अशा सूचना त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या. महिंद्रा मॅक्स वाहनातून २४ मजूर खडकी येथून गुजरातमधील रोस्का येथे जात असताना खडकीजवळील घाटात वाहकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन उलट       दिशेने ५०० मीटर खोल दरीत कोसळले. घटनेची माहिती      मिळताच जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी अधिकाऱ्यांना मदतीचे निर्देश दिले. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्वत: घटनास्थळी दाखल होऊन मदत कार्याची पाहणी केली. उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे हेदेखील यंत्रणेसह घटनास्थळी पोहोचले.अपघातात सहा व्यक्तींचा मृत्यू झाला. सात गंभीर प्रवाशांना तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. उर्वरित ११ प्रवाशांना किरकोळ दुखापत असल्याने त्यांना तोरणमाळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. दुपारी त्यातील आठ व्यक्तींना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री निधीतून आर्थिक मदत...नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळजवळ खडकी येथे मजुरांच्या वाहनाला अपघात होऊन सहा व्यक्ती मृत्युमुखी पडल्या होत्या. त्यात पाच महिलांचा समावेश आहे. या मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. मरण पावलेले मजूर हे आदिवासी असून अतिशय दुर्गम अशा धडगाव तालुक्यातील  आहेत. याशिवाय या अपघातात गंभीर व किरकोळ जखमी झालेल्या सर्वांवर उपचार सुरू असून ते देखील शासनाच्या खर्चानेच करण्यात येतील असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत. आज या घटनेची माहिती कळताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री के.सी. पाडवी तसेच जिल्हा प्रशासनाकडून याची माहिती घेत संपूर्ण मदत करण्याचा सूचना दिल्या.