बोरद येथे जुगार खेळणाऱ्या पाच जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:23 IST2021-06-02T04:23:22+5:302021-06-02T04:23:22+5:30
बोरद येथे हारजितचा बावन्न पत्ते जुगार सुरू असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती. पथकाने खात्री केली असता, बोरद ...

बोरद येथे जुगार खेळणाऱ्या पाच जणांना अटक
बोरद येथे हारजितचा बावन्न पत्ते जुगार सुरू असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती. पथकाने खात्री केली असता, बोरद गावातील संतोष जरीलाल पाडवी यांच्या घरासमोर मोकळ्या जागेत बाभळीच्या झाडाखाली पाच जण जुगार खेळत असल्याचे दिसून आल्यानंतर मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास या ठिकाणी धाड टाकली. या ठिकाणी १ हजार ४०० रुपयांची रोख रक्कम एका कापडावर दिसून आली. तसेच संतोष जरीलाल पाडवी याच्या शर्टाच्या खिशात एक हजार ८६०, दीपक रमनलाल जाधव याच्या खिशात १ हजार, दीपक कालिदास लोहार याच्या खिशात १५ हजार ५६०, राजू गोरख ढोढरे याच्या खिशात ५ हजार ९०० तसेच संजय बळीराम पवार याच्या खिशात ६६० रुपये रोख स्वरूपात अशी एकूण २६ हजार ३८० रुपयांची रोकड व पत्त्यांचा कॅट एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतला. या प्रकरणी एलसीबीचे पोलीस नाईक विशाल नगरे यांच्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात संतोष पाडवी, दीपक जाधव, दीपक लोहार, राजू ढोढरे, संजय पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हेड काॅन्स्टेबल विजय ठाकरे हे करीत आहेत.